Akola News : मालमत्ता करविरोधातील आंदोलनात शिवसेना आणखी आक्रमक

Shiv Sena : अकोला शहरातील गल्लीबोळात जात करीत आहेत जनजागृती
Shiv Sena Protest in Akola.
Shiv Sena Protest in Akola.Sarkarnama
Published on
Updated on

Akola Muncipal Corporation : कर वसुली ठेका पद्धतीच्या विरोधात अकोला येथील शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणखी आक्रमक झाला आहे. शहरातील गल्लीबोळात जात सेनेच्या कार्यकर्त्यांनी आता नागरिकांना जनजागृती करणारे पत्रक वितरण करण्यास सुरुवात केली आहे. बरखास्त होण्यापूर्वी अकोला महापालिकेत भाजप सत्तेवर होती. या पत्रकांच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

अकोला महापालिकेने मालमत्ता कर, पाणीपट्टी व बाजार वसुली ठेका पद्धतीने दिली आहे. या विरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आंदोलन सुरू केलेय. कर वसुलीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी करीत शिवसेना नेत्यांनी भाजपवर टिकास्त्र डागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन अकोल्यात सुरू आहे. मनपाने सर्व करांची वसुली ठेका पद्धतीने स्वाती कंपनीला दिली आहे.

Shiv Sena Protest in Akola.
Akola : ठाकरे गटाच्या आंदोलनाची ‘मशाल’ धगधगतीच, आता गुंठेवारीवरून आंदोलन

स्वाती इंडस्ट्रिजची 8.5 टक्के दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. यासाठी भाजप नेत्यांचा दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप शिवसेनेने यापूर्वीच केला होता. भाजपचे दोन नेते कंपनीत हिस्सेदार असल्याचा दावा शिवसेनेने पत्रकार परिषदेत केला होता.

अशातच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने रस्त्यावर उतरत नागरिकांशी कर वसुलीबाबत संवाद साधला व त्यांना पत्रकांचे वितरण केले. शिवसेना अकोला पश्चिम विधानसभेचे प्रमुख राजेश मिश्रा, अकोला पूर्व विधानसभेचे प्रमुख राहुल कराळे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अभय खुमकर, जोत्सना चोरे, सुनिता श्रीवास, वर्षा पिसोडे, गजानन गव्हाण, सोनू भरकर, विशाल घरडे, नितीन मिश्रा, ज्ञानेश्वर गावंडे, गजानन फुंडकर, आशुतोष शेगोकार, किरण ठाकरे, राजू पावडे, संजय भांबेरे, मनीष बुटे आदींनी आता शहराच्या गल्लीबोळातून स्वाती कंपनीच्या विरोधात प्रचार-प्रसार सुरू केलाय. घरबसल्या ऑनलाइन कर भरणाऱ्या नागरीकांच्या वसुलीचे कमिशनही स्वाती कंपनीला आयते मिळणार आहे. यावरही शिवसेनेचा आक्षेप आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना अकोला पश्चिम विधानसभेचे प्रमुख राजेश मिश्रा, अकोला पूर्व विधानसभेचे प्रमुख राहुल कराळे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अभय खुमकर, जोत्सना चोरे, सुनिता श्रीवास, वर्षा पिसोडे, गजानन गव्हाण, सोनू भरकर, विशाल घरडे, नितीन मिश्रा, ज्ञानेश्वर गावंडे, गजानन फुंडकर, आशुतोष शेगोकार, किरण ठाकरे, राजू पावडे, संजय भांबेरे, मनीष बुटे आदींनी आता शहराच्या गल्लीबोळातून स्वाती कंपनीच्या विरोधात प्रचार-प्रसार सुरू केलाय. घरबसल्या ऑनलाइन कर भरणाऱ्या नागरीकांच्या वसुलीचे कमिशनही स्वाती कंपनीला आयते मिळणार आहे. यावरही शिवसेनेचा आक्षेप आहे.

कर वसुलीच्या कंत्राटावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी आंदोलन कायम आहे. सिव्हिल लाइदन्स, रणपिसे नगर, जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, राऊत वाडी, उमरी, जठारपेठ चौक, रत्नलाल प्लॉट चौक परिसरात कर वसुली करणाऱ्या कंपनीच्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यापूर्वी शिवसेनेच्यावतीने अकोला शहरात स्वाक्षरी आंदोलन राबविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी चौकाचौकात सभा घेत भाजपच्या कथित भ्रष्टाचारावर पुराव्यांसह प्रहार केला होता. अशात आता शिवसेनेचा ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. चारही बाजुनं भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेना अकोल्यात करीत आहे. शिवसेनेच्या या आंदोलनाला अकोल्यातील जनतेकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Shiv Sena Protest in Akola.
Akola News : हिवरखेड नगर परिषद स्थापनेचा मुहूर्त सरकारला सापडेना!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com