Vanchit Bahujan Aaghadi : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामुळं स्थगित केली शिक्षण हक्क परिषद

Respect For Party Workers : सुजात आंबेडकरांनी राखला क्रीडाप्रेमी कार्यकर्त्यांचा मान
India Vs Australia World Cup 2023
India Vs Australia World Cup 2023Google
Published on
Updated on

Akola Political News : जगात क्रिकेटप्रेमींची संख्या कमी नाही. अनेक राजकीय नेतेही क्रिकेटचे चाहते आहेत. असाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यात आला आहे. रविवारी (ता. १९) भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी शिक्षण हक्क परिषद स्थगित केली. युवा कार्यकर्त्यांचा क्रिकेटबद्दलचा उत्साह पाहता त्यांनी हा निर्णय घेतला. देशाचा संघ विश्वचषकासाठी लढत देणार आहे.

अनेक युवा कार्यकर्त्यांमध्ये त्याबद्दल उत्सुकता होती. त्यामुळं कार्यकर्त्यांचा सन्मान राखत आपण शिक्षण हक्क परिषदच स्थगित केली, असं सुजात आंबेडकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितलं. (Vanchit Bahujan Aaghadi's Youth Leader Sujat Ambedkar Postponed Shikshan Hakka Parishad in Wardha Due to India Vs Australia Cricket World Cup 2023 Final Match)

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होत आहे. त्यामुळं देशभरात क्रिकेटज्वर शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेत्यांनीही आपले अनेक कार्यक्रम रद्द करीत क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्याचे प्लॅनिंग केलं आहे. वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं सुजात आंबेडकरांनी शिक्षण हक्क परिषदेचं आयोजन केलं होतं. गेल्या १५ दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्ते परिषदेची जय्यत तयारी करीत होते. शहरातील प्रत्येक चौकात आकर्षक होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. जिल्हाभर हॅन्डबिल वाटप करीत परिषदेचा प्रचार करण्यात आला.

सभेसह युवकांची बाईक रॅलीही नियोजित होती. मात्र रविवारी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. हा क्षण देशासाठी अभिमानाचा आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील ही बाब ओळखत सुजात आंबेडकर यांनी परिषद स्थगित केली. पुढील तारीख ते लवकरच जाहीर करणार आहेत. शिक्षण हक्क परिषद स्थगित झाल्यानं जय्यत तयारीमध्ये गुंतलेले युवा कार्यकर्ते काही वेळेसाठी हिरमुसले मात्र त्यांनी सुजात यांच्या निर्णयाचं स्वागतही केलं. २०११ नंतर भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुजात आंबेडकर हे देखील क्रिकेटप्रेमी आहेत. त्यांचेही विश्वचषकाच्या अंतिम सामान्याकडं लक्ष होतं. त्यामुळं ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी शक्य तिथे एलईडीची व्यवस्था करून मॅचचा आनंद घ्यावा, आपल्या जागी भारतीय संघाचं मनोबल वाढवावं, अशा सूचना सुजात यांनी कार्यकर्त्यांना केल्या. अकोला येथे सुजात मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामन्याचा आनंद लुटणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर व कार्यकर्ते असतील. अकोला शहरातील टॉवर चौक येथे वंचित बहुजन युवा आघाडीनं सामन्याच्या ‘लाइव्ह स्ट्रिमिंग’ची व्यवस्था केलीय. सुजात आणि अंजली आंबेडकर या देखील तेथे उपस्थित असतील.

Edited by : Prasannaa Jakate

India Vs Australia World Cup 2023
Vanchit To RSS : हिंदूराष्ट्र नव्हे संविधानानुसार देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com