Vanchit Bahujan Aghadi News : काँग्रेसचे खासदार म्हणतात, आंबेडकरांकडून प्रस्ताव यायला हवा, प्रवक्त्याचा नको !

Prakash Ambedkar : प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे.
Kumar Ketkar and Others
Kumar Ketkar and OthersSarkarnama
Published on
Updated on

Akola District Political News : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अद्यापही प्रस्ताव आला नाही. त्यांच्या प्रवक्त्याने पत्र लिहिले आहे. आघाडी जर करायची असेल तर पक्षाच्या अध्यक्षांनी स्वतः प्रस्ताव दिला पाहिजे. म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा सोनिया गांधी यांना प्रस्ताव द्यायला हवा, असं मत काँग्रेसचे राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी व्यक्त केलं. (Prakash Ambedkar says that there is no response)

कुमार केतकर आज (ता. चार) अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसच्या मनात आंबेडकर यांच्याबद्दल जर विरोध असता तर ते यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले नसते, असेही ते एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले. आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात एकत्र येण्यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाकडे प्रस्ताव देऊनही काँग्रेसकडून आपल्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे.

काँग्रेस नेतेही आघाडीसाठी सकारात्मक असल्याचे वारंवार सांगतात, मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही. दोन्ही बाजूंनी केवळ आरोप-प्रत्यारोप केले जातात. काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पत्र पाठवले असल्याचे माध्यमांना सांगितले. ते पत्रही त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी प्रतिक्रिया देत, प्रकाश आंबेडकर यांनी खर्गे यांना पाठवण्यात आलेले पत्र हे वंचितच्या पक्ष प्रवक्त्याचे असल्याचे म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत यायचे असेल, तर त्यांनी स्वतः तसा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा सोनिया गांधी यांना पाठवावा, असं म्हटलं आहे. काँग्रेसच्या मनात वंचितसोबत जाण्यावरून कुठलाही वाद नाही. कारण तसे जर असते तर यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला नसता, असेही ते म्हणाले.

नरेंद्र मोदींना स्पष्ट बहुमत मिळणार नाही !

भाजपच्या आगामी लोकसभा निवडणुकीत ७० जागा कमी होणार असल्याचा दावा कुमार केतकर यांनी केला आहे. मात्र, काँग्रेसच्या जागा वाढतील, असंही नाही. दरम्यान, समजा नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिलाच नाही, तर काय करतील असा सवाल केतकर यांनी करत. हे कुणीच सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मोदी हे आणीबाणी लावतील की सैन्य बोलावतील किंवा निवडणूक पुढे ढकलतील? पण निर्णय मान्य करणार नाहीत. जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं, अगदी तसंच. तसा मात्र तिथे लोकशाही असल्याने त्यांचं टिकलं नाही, पण मोदी काय करतील, हे निश्‍चित सांगता येणार नाही. दरम्यान, पत्रकारांवरील छापे हा दडपशाहीचा प्रकार असल्याचा आरोप केतकर यांनी केला.

Edited By : Atul Mehere

Kumar Ketkar and Others
Akola Political News : आमदार देशमुख- भाजपमधील 'कोल्डवॉर'नंतर तक्रारकर्त्या सरपंचाचे 'हे' खळबळजनक आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com