Vanchit Bahujan Aghadi News : सुजात आंबेडकरांचे ‘तांडे सामू चालो’, चार दिवस राहणार !

Sujat Ambedkar with Prakash Ambedkar : सुजात आंबेडकर ‘तांडे सामू चालो’ म्हणत बंजारा समाजाला आपलेसे करण्यासाठी निघाले आहेत.
Sujat and  Prakash Ambedkar
Sujat and Prakash AmbedkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचेकेंद्रस्थानी असलेले ॲड. प्रकाश आंबेडकर गेल्या काही महिन्यांपासून अकोला जिल्ह्यात अधिक सक्रिय झाले आहेत. शहर व जिल्ह्यातील प्रश्न, समस्या ते सातत्याने मांडत आहेत. आता त्यांचे चिरंजीव सुजात ‘तांडे सामू चालो’ (तांड्यांकडे चला...) म्हणत बंजारा समाजाला आपलेसे करण्यासाठी सरसावले आहेत. (Prakash Ambedkar announced to contest election from Akola Lok Sabha constituency)

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. राजकारणाच्या मदतीला त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर हेसुद्धा जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. ते जिल्ह्यातील प्रश्न सातत्याने मांडताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली जात आहे. सुजात आंबेडकर आता बंजारा समाज बहुसंख्येने असलेल्या भागाचा चार दिवस दौरा करणार आहेत.

सुजात याच्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर हे १९८४ पासून सातत्याने अकोला लोकसभा मतदार संघात निवडणूक लढत आहेत. आता २०२४ मध्ये सलग अकराव्यांदा ते अकोल्यातूनच निवडणूक लढविणार आहेत. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला आहे.

मात्र त्यानंतर भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे सातत्याने चार वेळा निवडून आले. आता २०२४ मध्ये लोकसभेत भाजपला शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या साथीला त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय झाले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीला आता नवा चेहरा मिळाला असल्याचे वंचितचे कार्यकर्ते सांगतात.

बंजारा समाजाची मोट बांधण्याचे काम !

बंजारा समाजातील बड्या नेत्यांना, महंतांना आपल्याकडे कसं ओढता येईल, असा प्रयत्न यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी केला. पश्चिम विदर्भात बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी हे संस्थान आहे. राज्यासह विदर्भात बंजारा मतदारदारांची मोठी संख्या आहे. काही दिवसांपूर्वी सुजात आंबेडकर यांनी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे जगदंबादेवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज व राष्ट्रीय संत रामराव महाराज समाधी दर्शन घेऊन बंजारा धर्मगुरूंशी चर्चा केली होती.

आता अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाच्या परिसराचा सुजात आंबेडकर हे बंजारा समाज धर्मगुरू संतोष महाराज पोहरागड, बापुराव महाराज पोहरागड यांच्या सह चार दिवस या भागात राहून दौरा करणार आहेत. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Edited By : Atul Mehere

Sujat and  Prakash Ambedkar
Vanchit Bahujan Aghadi : भाजप-आरएसएसचे गुंड धार्मिक द्वेष पसरवीत आहेत, ट्विट करून आंबेडकरांचा भाजपवर निशाणा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.