Ajay Ashar : मुख्यमंत्री शिंदेंच्या हट्टामुळे भाजपची अडचण? अजय आशर नियुक्तीचा वाद...

Ajay Ashar News : अजय आशर यांच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले
Eknath Shinde 
ajay ashar
Eknath Shinde ajay ashar Sarkarnama
Published on
Updated on

Ajay Ashar News : केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही नीती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच 'मित्र'ची स्थापना करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. त्यावरुन आता चांगलेच राजकारण रंगले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचा जुना व्हिडीओ ट्वीट करुन, कोंडी केली आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकरमध्ये आशर यांच्या निवडीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपने आता आशर यांची एवढ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती कशी होऊ दिली, असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आग्रहाखातर आशर यांची नियुक्ती महत्त्वाच्या पदावर करण्यात आल्याची चर्चा होत आहे. मात्र, दानवे यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेत शेलार यांचा एक व्हिडिओच शेअर केला आहे.

Eknath Shinde 
ajay ashar
"एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे.."

काँग्रेसने आशर यांच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आशर यांच्या नियुक्तीमुळे राज्यसरकार चुकीचा पायंडा पाडत आहे, आशर यांच्यासारख्या चुकीच्या व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. विरोधकांच्या टीकेमुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेलार यांनी नगरविकास विभागाच्या कारभारात मंत्रालयाबाहेरील व्यक्ती असणाऱ्या अजय आशर यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप केला होता. दानवे यांनी तोच व्हिडिओ ट्विट केला. नगरविकास विभागाचा कारभार चालवणारा अजय आशर कोण आहेत? मंत्रालयात बसलेल्या अधिकाऱ्यांच्या ते वर आहेत? विभागाचे निर्णय आशर घेतात का, असे अनेक प्रश्न शेलार यांनी त्या व्हिडिओत केले होते.

Eknath Shinde 
ajay ashar
साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई; तर शिवसेनेच्या दोन्ही गटात सामना रंगणार

दानवे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''आशिष शेलारजी तुम्हाला तुमच्याच व्हिडियोची आठवण करून द्यावी वाटली. ज्या अजय आशर यांच्यावर आपण आरोप केला, ते आशर तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले की तुमच्या पक्षाला 'खोके दर्शन' झाले? कारण त्यांना तुम्ही सत्तेचा लाभार्थी करून टाकलं!'' अशा शब्दांच दानवे यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com