विदर्भवादी संतापले; म्हणाले, तुम्ही विदर्भात येऊच नका...

संयुक्त महाराष्ट्रात (Maharashtra) समावेश करताना विदर्भातील (Vidarbha) अनेक नेत्यांनी विदर्भावर अन्याय होईल, अशी भीती व्यक्त केली होती.
Vidarbha Map
Vidarbha MapSarkarnama

नागपूर : विदर्भावर अन्याय होईल, अशी भीती संयुक्त महाराष्ट्राच्या (Maharashtra) स्थापनेच्या वेळी व्यक्त केली गेली होती, ती आता खरी ठरतेय. गेल्या दोन वर्षांपासून नागपूर (Nagpur) कराराचा भंग करून नागपुरात अधिवेशन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे विदर्भवादी संतापले आहेत. तुम्ही आता विदर्भात येऊच नका, आमचे आम्ही बघून घेऊ. आता नागपुरात अधिवेशन नकोच, स्वतंत्र विदर्भच हवा, असे खडे बोल विदर्भवाद्यांनी सरकारला सुनावले आहेत.

तुमची कारणे काहीही असोत. तुम्ही विदर्भाच्या (Vidarbha) भूमीवर येऊच नका, आम्ही आमचे बघून घेऊन अशी खरमरीत प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, प्रकाश पोहरे, रंजना मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुकेश मासुरकर, अरुण केदार यांनी व्यक्त केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्यावेळी जी भीती व्यक्त केली जात होती ती आता खरी ठरू लागली आहे. राज्यकर्त्यांनी विदर्भावर इतके वर्षे अन्याय केला आणि आता नागपूर कराराचा भंग केला जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.

संयुक्त महाराष्ट्रात समावेश करताना विदर्भातील अनेक नेत्यांनी विदर्भावर अन्याय होईल, अशी भीती व्यक्त केली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि नेत्यांनी समतोल विकासाची ग्वाही दिली होती. याशिवाय वैदर्भीयांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी वर्षातील एक अधिवेशन नागपूरला घेण्याचे आश्वासन दिले होते. तसा लेखी करारसुद्धा केला होता. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा विकास आणि सिंचनाच्या अनुशेषाची आकडेवारी सर्वांच्या समोर आहे. कोट्यवधींचा अनुशेष दूर करणे आता शक्य नाही, असे सांगून राज्यकर्ते हात झटकत आहेत. आता अधिवेशनाकडे पाठ फिरवणे नेत्यांनी सुरू केले आहे.

Vidarbha Map
EWS ची अट मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुळावर

नागपूर करारात ठरल्याप्रमाणे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे होत होते. मात्र कुठल्याही कारणाने का असेना, गेल्या दोन वर्षांपासून अधिवेशनाला खो देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सरकारला येथे अधिवेशन घेऊन विदर्भाचे प्रश्न सोडविण्यात काहीही स्वारस्य नाही. आजवर विदर्भाची एवढी लूट करून फसवणूक केली की, आता तुमच्यापुढे अन्यायाचा पाढा वाचून काहीही फायदा नाही. चुकीच्या योजनांमुळे आम्हाला प्रदूषण, वीज लोडशेडिंग, बेरोजगारी, कुपोषण यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे समितीने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com