Devendra Fadnavis: फडणवीसांच्या 'होमपीच'वर महायुतीचाच आमदार अडचणीत; 'मविआ' डाव टाकणार

Vidarbha Politics Mahayuti Vs Mahavikas Aghadi :विकासकामांच्या नावानं बोंब असल्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी त्यांना घेरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनी ही निवडणूक चांगलीच जड जाईल, असे चित्र आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

संजय जाधव

Buldhana: महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) टफफाईट दिली. आता विधानसभेसाठी आघाडीने कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमपीच असलेल्या विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीने महायुतीशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये तीन भाजपाचे आमदार, दोन शिंदे गट शिवसेनेचे आमदार व एक राष्ट्रवादी अजित पवार् गट व काँग्रेसचा एक आमदार आहे. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील विकासकामांच्या नावानं बोंब असल्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी त्यांना घेरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांनी ही निवडणूक चांगलीच जड जाईल, असे चित्र आहे.

मेहेकरमध्ये आमदार संजय रायामुलकर हे तीन वेळा निवडून आले आहेत. हे ठिकाण खासदार प्रतापराव जाधव यांचे निवास्स्थान आहे. येथे त्यांचा राजकीय दबदबा आहे. मेहेकर मतदार संघात आता महाविकास आघाडीतून काँग्रेस , शिवसेना(ठाकरे गट) राष्ट्रवादी अशा तीन पक्षातून एकच उमेदवार तगडी टक्कर देणार असल्याने यावेळी कौल बदलेल असे चित्र दिसते. मेहेकर हा मतदारसंघ राखीव असून अनुसूचित जातीचा आहे. विद्यमान आमदार खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर तीनवेळेस निवडून आले असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Eknath Shinde: अजितदादांच्या नेत्याची एकनाथ शिंदेंसोबत जवळीक वाढली; पुन्हा घरवापसी?

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड हे प्रथमच निवडून आले आहेत. त्यांनी विकास कामाचा झपाटा लावला असला तरी त्यांच्यात विविध धार्मिक, राजकीय वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याविषयी नाराजी असल्याचे दिसते. गायकवाड यांचा सुद्धा मतदारसंघात दबदबा आहे. संजय गायकवाड यांनी मतदारसंघात सर्वात जास्त विकास निधी खेचून आणल्याचा दावा केला आहे. बुलढाणा शहरात ठिकठिकाणी एकूण 26 पुतळे बसविले. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 19 सप्टेंबरला होणार आहेत.

जळगावजामोद मतदारसंघात चौथ्यांदा भाजपचे संजय कुटे आमदार आहेत. त्यांचा मतदारसंघ हा आदिवासी बहुल आहे. विकासाच्या नावाखाली मात्र बोंबाबोंब आहे. कुठेही विकास केला गेला नाही. शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत या मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाहीत. आजही सर्व मूलभूत सुविधेपासून आदिवासी वंचित आहे. तीन दिवसांपूर्वी अतिदुर्गम भागातील गोमाल या गावातील एक तरुणीसह तीन जणीचा अतिसारामुळे जीव गेला. गावाला जायला रस्ता नाही, झोळीत टाकून रुग्णांना 16 किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करून जळगावजामोद येथे आणावे लागते, अशी परिस्थिती संजय कुटे यांच्या मतदारसंघात आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Sanket Bawankule: लाहोरी बारमधील 'बीफ' राऊतांना 1हजार 1कोटींना पडणार?

चिखली मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले प्रथमच आमदार झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला मतदारसंघ आहे. व्यापाराची बाजारपेठ म्हणून ओळख आहे, मात्र परिस्थिती इतर मतदारसंघाप्रमाणे आहे. खामगाव मतदारसंघात भाजपचे आकाश फुंडकर हे आमदार आहेत्. खामगाव मतदारसंघ हा 'कॉटन बेल्ट' म्हणून ओळखला जातो. कापूस उत्पादक व त्यावर प्रक्रिया करून बाहेरच्या देशात कापूस निर्यात केला जातो, तर उद्योगनगरी असलेली जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी खामगावात आहे. मात्र शहरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. याठिकाणी काँग्रेसचे दिलीप सानंदा सतत चार वेळेस आमदार होते, मात्र यावेळेस प्रथमच भाजपाकडे हा मतदारसंघ गेला आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत. मतदारसंघात ग्रामीण भागत एकही रस्ता नाही. आरोग्य व्यवस्थेची कायम दुरावस्था, कुठलीच सुविधा नाही. शिंगणे हे अजित पवार गटात आहेत.. यावेळेस् ते शरद पवार यांच्या सोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मतदार संघातील जनता शिंगणे यांनी महायुतीत गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंगणे हे शरद पवार यांच्यासोबत जाऊन निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com