Vijay Wadettiwar : 'मतांवर दरोडा...'; विजय वडेट्टीवारांनी निवडणूक आयुक्तांवर डागली तोफ

Vijay Wadettiwar Chief Election Commissioner India Rajiv Kumar Nagpur Congress National Voters Day : निवडणूक आयोगाकडून मतदार दिवस साजरा होत असतानाच, काँग्रेसच्यावतीने निवडणूक आयोगाविरोधात आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अद्यापही काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांचा विश्वास बसत नाही. या निवडणुकीत मोठमोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे सर्वच धास्तवले आहे. नक्की काही तरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

'ईव्हीएम'ला दोष देत असताना काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. भाजपच्या फायद्यासाठी मतांवर त्यांनी दरोडा टाकल्याचा थेट आरोप केला.

काँग्रेसच्यावतीने (Congress) आज मतदार दिवस म्हणून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती देताना ते म्हणाले, "2019 ते 2024 या दरम्यान फक्त पाच लाख मतदार वाढले होते. मात्र सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीत 76 लाख मतदार कसे काय वाढले. याचा खुलासा निवडणूक आयोगाने केला नाही. हे सर्व संशयास्पद आहे. काहीतरी नक्कीच गडबड आहे". वाढीव मताचे पुरावे दिले जात नाही. आयोगाचे भाजपच्या फायद्यासाठी काम सुरू आहे, असा गंभीर आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
26/11 Mumbai Attack : मास्टरमाईंड दहशतवादी तहव्वूर राणाचा ताबा भारताला मिळणार; अमेरिकेकडून हस्तांतरणाला मंजुरी

'निवडणूक आयोग (Election Commission) मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यासह नकार दिला जात आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करीत आहोत. निवडणूक आयोग ही संस्था आता स्वायत्त राहिली नाही', अशी अशी तोफही विजय वडेट्टीवार यांनी डागली.

Vijay Wadettiwar
TOP Ten News : मनोज जरांगेंचं आंदोलन.., मुंबई 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंडचं हस्तांतरण.., वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

'लाडक्या बहिणीं'मुळे एसटी तोट्यात

लाडक्या बहीण योजनेमुळे एसटी तोट्यात गेली. याशिवाय भ्रष्टाचार आणि त्यास सरकार खतपाणी घालत असल्याने गरीब माणसाची लूट करण्यासाठी एसटीची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरोडा टाकायचाच असेल तर मोठ्यांवर टाका, गरिबांचा खिशाला भोक पडली असताना दरवाढीचे निर्णय घेणे चुकीचे आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

'स्मार्ट मीटर'वरून सरकारवर निशाणा

आम्ही निवडणुकीनंतर दर कमी करणार असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र याच्या उलटा कारभार ऊर्जा खात्याचा सुरू आहे. 2300 रुपयांचे स्मार्ट मीटर 12 हजार रुपयांमध्ये लावले जात आहे. या मीटरमुळे अर्ध्या रात्री रिचार्ज संपला तर लाईन बंद होईल. प्रीपेड मीटर हे गतीने फिरणारे मीटर आहे. कोणा एका उद्योगपतीच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com