Sharad Pawar On Bachchu Kadu : बच्चू कडूंचे नाव काढताच शरद पवार म्हणाले, "गल्लीबोळातल्या लोकांबाबत मला विचाराल..."

Maharashtra Politics : "काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत”, असा टोला बच्चू कडूंनी लगावला होता.
Sharad Pawar,Bacchu Kadu
Sharad Pawar,Bacchu KaduSarkarnama

Kolhapur : राष्ट्रवादीतील फुटीवरून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी खोचक टिप्पणी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज बच्चू कडूंची चांगलीच खिल्ली उडवली. कोल्हापुरात पत्रकारांनी बच्चू कडूंच्या आरोपांविषयी त्यांना विचारले असता, "बच्चू कडू कोण बाबा?' असा सवाल पवारांनी केला. पवारांनी अप्रत्यक्षपणे कडूंना सुनावलं.

"मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळेस राज्याचा मुख्यमंत्री राहिलेलो आहे. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मी सांभाळली. मला कोणाच्याही वक्तव्यांबाबत काय विचारता. उद्या गल्लीबोळातील लोकांविषयी मला प्रतिक्रिया विचाराल," असे सांगत पवारांनी बच्चू कडूंना डिवचलं.

Sharad Pawar,Bacchu Kadu
Sharad Pawar News : ते मुर्खांच्या नंदनवनात राहतात ; भाजपच्या दोन नेत्यांवर शरद पवारांचे शरसंधान

'अजित पवार आमचेच नेते,' असे विधान शरद पवारांनी काल (शुक्रवारी) केले होते. त्यांचा विधानाचा अर्थ अनेक नेत्यांनी लावण्याचा प्रयत्न केला. त्यावर "काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत”, असा टोला बच्चू कडूंनी लगावला होता.

"बच्चू कडू कोणाच्याही पाठिंब्याशिवाय चार वेळेस निवडून आलेले आहेत. ते चार वेळेस आमदार राहिलेले आहेत," पत्रकाराच्या या विधानावर पवार म्हणाले, "बच्चू कडू चार वेळेस आमदार झालेत, तर मी चार वेळेस मुख्यमंत्री राहिलेलो आहे. काही फरक आहे ना?"

Sharad Pawar,Bacchu Kadu
Sharad Pawar News : पक्ष म्हणजे आमदार नव्हेत.. ; राष्ट्रवादीत फूट नसल्याचा शरद पवारांचा पुनरुच्चार ; मी राष्ट्रीय अध्यक्ष..

काय म्हणाले होते बच्चू कडू..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे. थेट ऑलिम्पिकसारखाच गेम असू शकेल. पवार काका-पुतण्या महाराष्ट्रातील लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिले तर डोके फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करीत नाहीत. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडले तसे इथे दिसत नाही. राष्ट्रवादीने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com