Vijay Wadettiwar on Bawankule : बावनकुळेंनी राहुल गांधींना नक्षल समर्थक म्हटल्याने वडेट्टीवार संतापले, म्हणाले...

Vijay Wadettiwar on Eknath Shinde News '..त्यांनतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार नाही.' असंही विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News शहरी नक्षलवाद्यांना समर्थन देण्यासाठी राहूल गांधी संविधान सन्मान संमेलनाला उपस्थिती राहिल्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आरोपामुळे काँग्रेसचे नेते सांगलेच संतापले आहेत. आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

राहुल गांधींना अर्बन नक्षल समर्थक म्हणणे आणि संविधानाचा जागर करणाऱ्यांना संस्थांचा हा अपमान असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. सरकार तुमच्याकडे आहे, तपास यंत्रणा तुमच्या आहेत हे खरे असेल तर चौकशी करा, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी भाजपला दिला.

विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar ) म्हणाले, 'संविधान संमेलन सातत्याने होत असते. ते प्रथमच नागपूरमध्ये आयोजित केले नाही. यापूर्वी विविध राज्यांमध्ये तसेच कोल्हापूरमध्येसुद्धा संमेलन घेण्यात आले होते. यात कुठल्याही राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आले नव्हते. आयोजकांनीच राहूल गांधी यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार राहूल गांधी संविधान संमेलनाला उपस्थित राहिले. ते काँग्रेस नेते असल्याने आम्ही त्यांच्या स्वागतासाठी पुढाकार घेतला. एवढाच काँग्रेस आणि संविधानच संमेलनाचा संबंध आहे.'

Vijay Wadettiwar
Rahul Gandhi News : राहुल गांधींची महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी घोषणा; आता दर महिन्याला बँक खात्यात 'खटाखट'..!

याशिवाय, 'राहूल गांधी(Rahul Gandhi) संविधान संमेलनाला येणार अससल्याचे कळले तेव्हापासूनच भाजपचे नेते अस्वस्थ झाले होते. वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करणे सुरू केले. मीडियाला प्रवेश नाही असे सांगण्यात आले. राहुल गांधी मीडियाला घाबरतात अशाही अफवा पसरवण्यात आल्या. मात्र राहुल गांधी कोणाला घाबरत नाही.' असंही वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar : 'जयंत पाटलांना वाटलं असेल कशाला मी 'तुतारी'चा..' ; अजित पवारांनी लगावला टोला!

याचबरोबर 'आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याकडेही वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांचे लक्ष वेधले. दहा वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. मोदी पंतप्रधान आहेत. मात्र आजवर त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. अडीच वर्षांपासून राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे. मात्र शिंदे यांचे सरकार २३ तारखेपर्यंतच आहे. त्यांनतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.'' दावाही वडेट्टीवार यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com