Vijay Wadettiwar On Jarange: मनोज जरांगे पाटील तुमचा बोलविता धनी कोण? विजय वडेट्टीवारांची भाजपवर शंका

Maratha Vs OBC : मनोज जरांगे आता सामान्य जनतेसाठी की विरोधकांच्या विरोधात आहे, हेच कळत नाही. हे बघता त्यांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न उपस्थित होतो असे सांगून वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजवपर शंका व्यक्त केली.
Manoj Jarange - Vijay Wadettiwar
Manoj Jarange - Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: मराठा समजाच्या आरक्षणासाठी वारंवार आमरण उपोषण आणि आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला कोंडीत पकडणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तोफेची दिशा बदलली आहे. त्यांच्या टार्गेटवर आता राहुल गांधी आणि काँग्रेस आले आहेत. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण अशी विचारणा करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर शंका व्यक्त केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटची त्यांनी मागणी मान्य केली आहे. तसा जीआरसुद्धा काढला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी आक्रमक झाले आहेत. हा जीआर रद्द करावा अशी मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात १० ऑक्टोबरला काँग्रेसने नागपूरमध्ये मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ओबीसी समाजाचा रोष दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत कॅबिनेट मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्व ओबीसी मंत्र्यांशी चर्चा केली होती. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसीचे नुकसान होणार नाही असा दावा त्यांचा आहे. मात्र यामुळे ओबीसी नेत्यांचे समाधान झाले नाही.

काँग्रेस मोर्चा काढण्यावर ठाम आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस असो किंवा महाविकास आघाडीवर कधी आरोप केले नाही. त्यांची मागणी मंजूर होताच त्यामुळे जरांगे यांनी आता काँग्रेसला टार्गेट करणे सुरू केले होते. यावर विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याचे कारण काय अशी विचारणा केली आहे.

Manoj Jarange - Vijay Wadettiwar
Maharashtra Reservation: लातूर हादरलं! दोन 'आरक्षण' आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा धक्कादायक खुलासा; 'फेक सुसाईड नोट'नं खळबळ, पहिलीच मोठी कारवाई

सर्व समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे अशी भूमिका राहूल गांधी यांची आहे. यासाठी जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी ते सातत्याने करीत आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याला विरोध करण्याचे कारणच नाही.

मनोज जरांगे आता सामान्य जनतेसाठी की विरोधकांच्या विरोधात आहे, हेच कळत नाही. हे बघता त्यांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न उपस्थित होतो असे सांगून वडेट्टीवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजवपर शंका व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com