Chandrapur APMC News: पटोलेंनी वडेट्टीवारांना दूर ठेवल्यामुळे गडचिरोलीत सुपडा साफ, चंद्रपुरात आठ बाजार समित्यांवर झेंडा !

Vijay Wadettiwar News: १२ पैकी आठ बाजार समित्यांवर कॉंग्रेसने झेंडा फडकावला.
Vijay Wadettiwar and Nana Patole
Vijay Wadettiwar and Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur and Gadchiroli District's APMC Election News : चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकांमध्ये कोणती बाजार समिती कुणाकडे, याचा फैसला होणार होता, तो झाला आणि १२ पैकी आठ बाजार समित्यांवर कॉंग्रेसने झेंडा फडकावला.

निवडणुका झाल्या तेव्हाचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे यश कॉंग्रेसने संपादित केल्याचे सांगण्यात येते. गटबाजी भलेही असो पण कॉंग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यात चांगले यश मिळवले. जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे आमदार आमदार विजय वडेट्टीवार आणि राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांनी रणनीती आखून बाजार समितीचे मैदान मारले. गटबाजी नसती तर याहीपेक्षा मोठे यश कॉंग्रेसला मिळाले असते, असे राजकीय जाणकार सांगतात.

कॉंग्रेसला जर कुणी हरवू शकत असेल, तर ती म्हणजे कॉंग्रेसच, असे नेहमी बोलले जाते आणि ते खरेही आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा गेल्या महिन्यात नागपुरात झाली. जबाबदारी कॉंग्रेस नेते, माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्यावर होती. दर्शन कॉलनीतील मैदानाच्या वादावरून ती सभा चांगलीच गाजली. सभा जोरदार झाली. पण तेथेही कॉग्रेस नेत्यांमधील वाद बघायला मिळाला. काही नेते आयता स्टेज कशाला सोडायचा म्हणून आले, तरी काहींनी सपशेल दांडी मारली. पण सभा यशस्वी झाली.

सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नेतृत्व मान्य नाही, असं एकंदरीत घडामोडींवरून दिसून आले. हाच प्रभाव बाजार समित्यांच्या निवडणुकीत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दिसून आला. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या निवडणुकांची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे असायची. त्यांनी नेहमीच पक्षाला तेथे पक्षाला यश मिळवून दिले आहे. पण यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांना गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली नाही. गडचिरोलीचे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे कमी पडले. परिणामस्वरूप तेथे चार बाजार समित्यांमध्ये ७२ पैकी एकही संचालक कॉंग्रेसचा निवडून येऊ शकला नाही.

Vijay Wadettiwar and Nana Patole
Vijay Wadettiwar : गोळीबार प्रकरणात पालकमंत्र्यांचे लक्ष नाही, वडेट्टीवारांचा आंदोलनाचा इशारा...

गडचिरोली जिल्ह्यात कॉंग्रेस जवळपास शुन्यावर आली. नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जेव्हा वडेट्टीवारांकडे जबाबदारी होती, तेव्हा कॉंग्रेसने चांगली कामगिरी करत जास्तीत जास्त नगरपंचायतींवर झेंडा फडकावलेला आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात १२ पैकी भाजपला केवळ तीन बाजार समित्या मिळाल्या, एक शिवसेनेला तर बाकी आठ जागांवर कॉंग्रेसने झेंडा फडकावला. कॉंग्रेसने ज्या बाजार समिती गमावल्या त्यामध्ये वरोरा आणि भद्रावतीचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या दोन धुरंधर नेत्यांमधील आपसी वादामुळे या दोन बाजार समित्या कॉंग्रेसच्या हातून गेल्या, असे राजकीय विश्‍लेषक सांगतात. एकीने लढले असते तर चित्र वेगळे राहिले असते, असेही सांगितले जाते. एकीने लढल्यास काय होऊ शकते, हे कॉंग्रेसने नागपूर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिले आहे. या दोन्‍ही निवडणुकांमध्ये कॉंग्रेस नेत्यांनी भाजपचा गड उद्ध्वस्त केला.

Vijay Wadettiwar and Nana Patole
Vijay Wadettiwar News : राजकारणात सर्वांचीच घरे काचेची असतात, असं का म्हणाले वडेट्टीवार?

गडचिरोली (Gadchiroli) हा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा मूळ जिल्हा आहे. पण बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना गडचिरोलीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले, अशी सूत्राची माहिती आहे. परिणामी तेथे कॉंग्रेसचा (Congress) सुपडा साफ झाला. वडेट्टीवार मैदानात उतरले असते, तर चित्र काही औरच राहिले असते. एके काळी वडेट्टीवारांनी सर्वाधिक नगरपंचायतींवर पक्षाला विजय मिळवून दिला होता. पण यावेळी प्रदेशाध्यक्षांनी वडेट्टीवारांना डावलून पक्षाचे नुकसान केले, अशीही एक चर्चा जिल्ह्यात आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com