Kishori Pednekar : उद्धव ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांना जनता जागा दाखवेल

Lok Sabha Election 2024 : किशोरी पेडणेकर यांची टीका; निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची यात्रा
 Kishori Pednekar
Kishori PednekarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : शिवसेना सोडून जाणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी न डगमगता येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभूत करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ठाकरे गटाने स्री संवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

शिवसेनेच्या स्त्री संवाद यात्रेला बुधवारी (ता. 17) रामटेकहून सुरूवात होणार आहे. त्यासाठी पेडणेकर नागपूर येथे आल्या आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा फिरणार आहे. यात शिवसेनेच्या प्रमुख नेत्या सहभागी होणार आहे.

 Kishori Pednekar
Shiv Sena : रश्मी ठाकरे धरणार विदर्भातील महिलांचा हात; भावनिक साद घालत लावणार गद्दारांची वाट

रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे ही जागा उध्दव ठाकरे गटांसाठी महत्वाची आहे. हे लक्षात घेऊन यात्रेसाठी रामटेकची निवड करण्यात आली आहे. रश्मी ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, संजना घाडी व अन्य महिला नेत्या राहाणार आहेत.

आमदार अपात्रतेच्या विषयावर बोलताना पेडणेकर यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाचे स्क्रिप्ट दिल्लीहून लिहून आले होते. एक स्क्रिप्ट नेहमी जनतेजवळ असते. मुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांचा निकाल जनताच लिहिल, असेही त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग यापूर्वीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने विदर्भातून फुंकले आहे. काँग्रेसने पक्षाच्या स्थापनादिनी ‘है तयार हम’ ही महारॅली नागपुरात घेतली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने शहरातील कस्तूरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी शंखनाद केला. काँग्रेस आणि ‘वंचित’चा कित्ता गिरवत आता शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही विदर्भातूनच प्रचार सुरू केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रामटेकमध्ये कृपाल तुमाने हे खासदार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते मुकुल वासनिक यांचा पराभव करीत तुमाने यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळवून दिला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर तुमाने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणे पसंत केले. अशात ठाकरे गटानेही तुमाने यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी रामटेकमध्येच स्त्री संवाद यात्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited by : Atul Mehere

 Kishori Pednekar
Nagpur Congress : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे काम पूर्णत्वाकडे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com