Wadettivar Become Aggressive : वडेट्टीवार खवळले; म्हणाले, निष्ठा बदलून विष्ठा खाण्याची रवी राणांची प्रवृत्ती !

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी जो धक्का दिला, त्यावर उद्या चर्चा होणार आहे.
Vijay Wadettiwar, Ravi Rana and Ashok Chavan
Vijay Wadettiwar, Ravi Rana and Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Wadettivar Become Aggressive : राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी काल (ता. 12) कॉँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर उद्या (ता. 14) मुंबईत कॉँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अशोक चव्हाण प्रकरणावर चर्चा होणार आहे.

आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, रमेश चेनीथल्ला यांच्या उपस्थितीची काँग्रेसची बैठक आहे. सर्व वरिष्ठ नेत्यांना त्यांनी बोलावलेले आहे. लोणावळा येथे 16 आणि 17 तारखेला पक्षाची बैठकसुद्धा आहे. राजकारणात पक्षात बदल होत असतात. लोक जात असतात, येत असतात. एक व्यक्ती गेली म्हणजे पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला, असं समजण्याचं कुठलंही कारण नाही. या परिस्थितीतून काँग्रेस नव्याने उभारी घेईल आणि पक्ष अधिक मजबुतीने उभा राहील.

विजय वडेट्टीवारसुद्धा अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ कॉँग्रेस सोडणार, अशी चर्चा विरोधकांकडून पसरविली जात आहे. याबाबत विचारले असता, माझ्यासंदर्भात काही लोक वावड्या पसरवण्याचे काम करीत आहेत, असे सांगत त्यांनी थेट अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणांवर हल्ला चढवला. अमरावतीच्या रवी राणाची प्रवृत्ती निष्ठा बदलून विष्ठा खाण्याची आहे, अशी कडवट टीका रवी राणा यांच्यावर वडेट्टीवारांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar, Ravi Rana and Ashok Chavan
Wadettiwar VS Bangar : लहान मुलांना दोन दिवस उपाशी राहायला सांगणारा विद्वान, संत महात्मा !

मला काँग्रेस पक्षाने खूप काही दिलेले आहे. आता मला फार काही अपेक्षा नाही. शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याचा निर्धार मी केलेला आहे. महाराष्ट्राचे प्रभारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भातील चर्चा पुढे येईल. अशोकराव चव्हाण यांच्याशी माझे पंधरा ते सोळा वर्षांपासून कौटुंबिक स्नेहाचे संबंध आहेत, पण याचा अर्थ मी त्यांच्या पाठीमागे जाईल, असा होत नाही. मुंबईची इंडिया आघाडीची बैठक असेल किंवा नागपूरला झालेली काँग्रेसची सभा, आम्ही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन काम केलेलं आहे. संबंध आणि विचारधारा वेगळी असते, असे वडेट्टीवार म्हणाले.

चव्हाण यांच्या राजीनाम्याबद्दल मला फार काही माहिती नाही, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. अशोक चव्हाण यांच्यामागे केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं. हे नाकारून चालणार नाही. भाजप ‘चारसो पार’ चा नारा देत असताना दुसऱ्यांचे नेते का पळवत आहे. त्यांना स्वतःवरच विश्वास राहिलेला नाही, अशी परिस्थिती सध्या देशात दिसते आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावाने राजकारण झालं, पण त्यातून काही साध्य झालं नाही. मात्र, दुसऱ्याचे नेते पळवून काम करत आहे. ते लोकांना मान्य होणार नाही.

Edited By : Atul Mehere

R

Vijay Wadettiwar, Ravi Rana and Ashok Chavan
Vijay Wadettiwar News : गाड्या काय फोडता, सभा घेऊन निखिल वागळे यांचे मुद्दे खोडून काढा ना…

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com