Vijay Wadettiwar Statement: विदर्भात आघाडीचे ४५ आमदार दिसतील; वडेट्टीवारांचा विश्वास

Congress News : विरोधी पक्षनेते पदावर नियुक्ती झाल्यावर ते प्रथमच नागपूरला आले होते.
Vijay Wadettiwar Statement
Vijay Wadettiwar StatementSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News: भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असली तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील ६० जागांपैकी ४५ आमदार महाविकास आघाडीचे निवडूण येतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते व विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते पदावर नियुक्ती झाल्यावर ते प्रथमच नागपूरला आले होते. त्यानंतर प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, आजवरचे विरोधी पक्षनेते भाजपसोबत (BJP) गेले आहेत. मात्र, मी जाणार नाही. तुमाच विश्वास नसेल तर लिहून देतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविवाहित राहीन पण राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोबत घेणार नाही, असे सांगितले होते. त्यांनी शब्द मोडला असला तरी मी मोडणार नाही, असा जोरदार टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

Vijay Wadettiwar Statement
Ahmednagar Politics: सदाभाऊ खोतांचा जुना व्हिडिओ व्हायरल करत मोरेंची शेट्टींसाठी भावनिक पोस्ट !

मुख्यमंत्री, मंत्री नाही झालो नाही तरी चालेल. मात्र, काँग्रेस (Congress) सोडणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. यापूर्वी निवडणुकीच्या शेवटच्या वर्षात मी विरोधी पक्षनेता होतो. तत्कालीन निवडणुकीत २० आमदाराही निवडूण येतील की नाही अशी शंका काँग्रेसला होती. मात्र, आम्ही अर्धशतकाजवळ पोहचलो. महाविकास आघाडी जुळून आली आणि आमचे सरकारही स्थापन झाले. आता पुन्हा कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षांत विरोधी पक्षनेता झालो. त्यामुळे आगामी सरकारही आमचेच राहील, असे भाकीत वडेट्टीवार यांनी वर्तविले.

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसच्या ३० आमदारांनी हायकमांडला पत्र दिले होते. यावरून काँग्रेसमध्ये मतभेद आहेत असे दिसून येते. याप्रश्नावर वडेट्टीवार यांनी तो एक गंमतीशिर प्रयोग होता, असे सांगितले. त्यामध्ये काही वावगे नाही. आमच्या पक्षात लोकशाही आहे. हायकामांड जो निर्णय घेतात तो सर्व मान्य असतो. त्यामुळे नाराजी वगैरे काहीच नाही.

Vijay Wadettiwar Statement
Amit Shah On Congress : काँग्रेसचा काळ म्हणजे दंगलीचा काळ; अमित शाहांनी घटनांची यादीच दिली

नागपूरमध्ये ओबीसींची मोठी रॅली काढण्याचे नियोजन केले जात आहे. यात सहभागी होण्यासाठी खासदार राहूल गांधी यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत. रॅलीत देशभरातील ओबीसी समाजाचे आजी-माजी मुख्यमंत्री, नेते यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. मुंबई, नागपूर महापालिकेत पराभवाची भीती वाटत असलेल्या भाजप निवडणूक घेण्यास टाळाटाळ करीत, असल्याचा आरोप त्यांनी केला. चाचपणी करण्यासाठी त्यांनी सर्व्हे केला होता. त्यात पराभव दिसत असल्यानेच शिवसेना फोडली, असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यानेही काही फरक पडत नाही, असे दिसून येताच राष्ट्रवादी काँग्रेसला फोडले. मात्र, भाजपने कितीही तोडफोड केली तरी त्यांचा पराभव निश्चित असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com