Wadettiwar on Fadanvis : मुख्यमंत्री म्हणून गेले असते, तर बरं झालं असतं; वडेट्टीवारांचा फडणवीसांना टोमणा !

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री म्हणून गेले असते तर काही तरी आणलं असतं.
Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis
Vijay Wadettiwar and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून जापानला गेले असते, तर बर झालं असतं, हेच मी बोललो होतो. कारण मुख्यमंत्री म्हणून गेले असते तर काही तरी आणलं असतं. पण उपमुख्यमंत्री म्हणून गेल्याने जापानमधून महाराष्‍ट्रासाठी काही तरी आणतील, असं वाटत नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना टोमणा मारला. (No one can trust words, promises today)

आज (ता. २५) नागपुरात वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. शरद पवारांच्या वक्तव्यांबद्दल विचारले असता, ‘ही’ शरद पवार यांची स्ट्रॅटिजी असेल, असं वाटतं. पण तरीही शरद पवार यांच्या वक्तव्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारला तर बरं होईल. आज राजकारण अस्थिर झालं आहे, शब्दांवर, आश्वासनांवर आज कोणी विश्वास ठेवू शकत नाही. भाजपने राजकारण नासवलं आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

ज्यांनी जनतेचा विश्वासघात केला, त्यांना जनता जागा दाखवेल आणि हे निवडणुकीच्या मैदानात स्पष्ट होईल. त्यांच्या पक्षाबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. कोर्टात केस सुरू होईल म्हणून त्याच्या स्ट्रॅटिजीचा तो भाग असू शकतो. प्रत्येक पक्षात काम करताना अनेकदा शेवटच्या क्षणी फूट पडते, त्यावर ते आपला प्लॅन बी ठेवतात, कोण कुठं जातं हे निवडणुकीत स्पष्ट होईल.

आम्हाला धोका वाटण्याचं कारण नाही. शेवटचे एकच उत्तर असेल. निवडणुकीच्या तारखेपर्यंत जे ठरेल, ते त्यावेळी दिसेलच. स्वार्थामुळे अनेक जण बरबटलेले आहे. कुणाला जनतेशी देणं घेणं राहिलं नाही. निवडणुकीतच चित्र स्पष्ट होईल आणि ‘इंडिया’च्या पाठीशी लोक असतील. कारण आता भाजप सरकारची लोकप्रियता संपली, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis
Wadettiwar on Sharad Pawar : शरद पवारांबाबत संशय वाटत नाही, ‘इंडिया’त फूट पडेल, अशी वक्तव्ये कुणी करू नये !

१६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत विचारले असता, जो निर्णय घ्यायचा तो विधानसभेचे अध्यक्ष घेतील. पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन चॅलेंज करण्याचा अधिकार आहे. तरीही ते १६ आमदार वाचणार नाहीत. आम्ही महाराष्ट्र आणि इंडिया जिंकणार. समजा निवडणुकीत कुणी धांदल केली तरच तरच निकाल वेगळे लागतील. कारण सर्व्हेत ‘इंडिया’ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असून काही उपयोग नाही, इशारा इशाऱ्यांत काम सुरू आहे, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

सना खान खून प्रकरणात जबलपूरचे आमदार संजय शर्मा यांची नागपूर पोलिसांनी चौकशी केली. याबाबत विचारले असता, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. या प्रकरणात नागपुरातील (Nagpur) भाजप नेते आहेत.

आमच्या नेत्यांना उघडपणे बोलवलं जात आणि भाजपच्या लोकांना चुपचाप बोलवलं जात, यात अनेक नाव सत्ताधाऱ्यांशी जोडलेले आहेत. अनेक मोठे नेते यात जुळले आहेत. गरज पडल्यास चौकशीसाठी गृहमंत्री यांना पत्र देऊ, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com