Wadettiwar On Rane : आधी स्वतः मंत्री व्हा; अन् मग दुसऱ्यांबद्दल बोला, वडेट्टीवारांनी सुनावले!

Nitesh Rane's Statement : राणेंच्या या विधानानंतर कॉंग्रेसच्या गोटात विविध चर्चांना ऊत आलाय.
Vijay Wadettiwar and Nitesh Rane
Vijay Wadettiwar and Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur District Political News : येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महायुतीचे मंत्री असतील, तशी चर्चा आमच्या महायुतीत सुरू असल्याचे नितेश राणे म्हणाले. जे वारंवार पक्ष बदलतात त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षनिष्ठेबाबत उगाचच प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राणेंवर पलटवार केला आहे. (After this statement of Rane, various discussions have taken place in the Congress)

राणेंच्या या विधानानंतर कॉंग्रेसच्या गोटात विविध चर्चांना ऊत आलाय. याबाबत आज (ता. २७) चंद्रपुरात पत्रकारांनी वडेट्टीवारांना विचारले असता ते म्हणाले, आपण काँग्रेसचे एकनिष्ठ शिपाई आहोत. नितेश राणेंनी आधी मंत्री व्हावे, दुसऱ्यांच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवू नयेत, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी राणेंना दिला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. ४० आमदार घेऊन त्यांनी भाजपचा हात धरला. अन् ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. यादरम्यान अनेकांनी आपली पक्षनिष्ठा बाजूला ठेवत शिंदेंचा हात धरला. एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष लोटण्याआधीच राष्ट्रवादीतही फूट पडली. अजित पवारांनी आपले समर्थक आमदार आणि खासदारांसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेतील अनेक नेते भाजपमध्ये गेले. ईडीच्या भीतीपोटी भाजपमध्ये ही इनकमिंग सुरू असल्याच्या चर्चा तेव्हा चांगल्याच रंगल्या होत्या, आताही होतात. वादग्रस्त व बेताल वक्तव्य करून राज्याचे लक्ष वेधणारे म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे. या वेळी त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाच टार्गेट केले.

येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत वडेट्टीवार हे महायुतीत दिसतील, ते महायुतीचे मंत्री होतील, असे विधान करून राणे यांनी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून दिली. आधीच विविध पक्ष आपला एक-एक नेता आपल्यापासून दूर जाऊ नये, याची खबरदारी घेत आहे. अशा वेळी राणेंनी केलेल्या विधानानंतर चर्चांना वेग आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज चंद्रपुरात होते. त्यांनी येथूनच राणेंना खडे बोल सुनावले.

तीन-तीनदा पक्ष बदलविणाऱ्या परिवाराने दुसऱ्यांच्या पक्षनिष्ठेवर उगीचच काहीतरी बोलून लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नये. आपण नारायण राणेसोबत कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. त्यानंतर राणे यांनी पुन्हा पक्ष बदलवत वेगळी भूमिका घेतली होती. आपण मात्र कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्धार केला.

Vijay Wadettiwar and Nitesh Rane
वडेट्टीवारांची टीका दादा गटाच्या जिव्हारी, Rupali Patil Thombare संतापल्या | Vijay Wadettiwar |

बहुजनांच्या हितासाठी आपण कॉंग्रेससोबत एकनिष्ठेने काम करत राहू. सत्तेसाठी आपण कधीच हपापलेला नव्हतो आणि आजही नाही. कॉंग्रेस हायकमांडने दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपली वाटचाल सुरू आहे. पद, सत्ता येते अन् जाते. पण आपला स्वाभिमान टिकला पाहिजे, असा टोला या वेळी वडेट्टीवारांनी राणेंना लगावला.

तीन ठगांचे सरकार...

राज्यात सध्या तीन ठगांचे सरकार आहे. सत्तेसाठी लाचार होऊन भाजपच्या दावणीला काही जण बांधल्या गेलेले आहेत. तीन ठगांचे सरकार राज्याला अधोगतीकडे घेऊन जात आहे. आपण याविरोधात अतिशय ताकदीने लढू, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Vijay Wadettiwar and Nitesh Rane
Chandrapur OBC Andolan: सर्वपक्षीय ओबीसींची बैठक घ्या; ताकत कळेल, असं का म्हणाले वडेट्टीवार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com