Ramdas Tadas : 'पितांबर अन् जनेऊ घालून या, तरच गर्भ गृहात प्रवेश'; भाजपच्या माजी खासदाराला प्रभू रामाच्या मंदिरात मिळाली विचित्र वागणूक

Former BJP MP Ramdas Tadas Ram Temple Devli village Wardha district : वर्धा इथले भाजप माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा तडस यांना देवळी गावातील राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून न दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
Ramdas tadas 2
Ramdas tadas 2Sarkarnama
Published on
Updated on

Wardha BJP news : प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देश ढवळून काढणारा भाजप आता देशात आणि राज्यात सत्तेवर आहे. परंतु त्याच प्रभू रामाच्या मंदिराच्या गर्भगृहात भाजपच्या माजी खासदाराला त्याच्या पत्नीसह प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय.

श्रीराम नवमी आणि भाजपच्या स्थापना दिनी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. वर्धा इथले भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा शोभा तडस यांच्याबरोबर हा प्रकार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घडला. गेली 40 वर्षे रामलल्लाचं दर्शनासाठी जातो आहे, पण यावेळी विचित्र वागणूक मिळाल्याची प्रतिक्रिया रामदास तडस यांनी दिली.

वर्धा इथले भाजपचे (BJP) माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा शोभा तडस हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह देवळी इथल्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मंदिरातील पुजाऱ्यानं पितांबर अन् जनेऊ धारण केलेले नाही, म्हणून गर्भ गृहात आपण प्रवेश करू शकत नाही, असे माजी खासदार तडस आणि त्यांची पत्नी शोभा तडस यांना रोखण्यात आले.

Ramdas tadas 2
Yashwant Bhosale : 'दुर्दैवानं सांगावं वाटतं, मी भाजपचा कार्यकर्ता'; 'श्रमिक'च्या भोसलेंचा नक्षलवादावर फडणवीस सरकारला घरचा आहेर

मंदिराचे (Temples) विश्वस्त प्रा. मुकुंद चौरीकर यांनी तडस दाम्पत्याला पितांबर आणि जनेऊ धारण केलेले नाही. त्यामुळे त्यांना गर्भ गृहात जाऊन दर्शन करण्याची परवानगी नाही. हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकीत झाले. शेवटी, माजी खासदार तडस यांनी मंदिराच्या गर्भ गृहाबाहेर स्थित श्री संत गणपतराव महाराज यांच्या समाधीवर माल्यार्पण केले आणि गर्भ गृहात न जाता दर्शन घेऊन मागे फिरले.

Ramdas tadas 2
Phule Movie : फुले चित्रपटात खरंच ब्राह्मणांची बदनामी करणारी दृश्य? छगन भुजबळ काय म्हणाले?

विचित्र वागणूक दिल्याचा तडस यांचा दावा

रामदास तडस म्हणाले, मागील 40 वर्षांपासून या मंदिरात मी दर्शनासाठी जातो, फार पुरातन मंदिर आहे. मंदिरची दोनशे एकर जमीन सुद्धा आहे. या ठिकाणी अनेक वाद आहे, पुजारी आणि विश्वस्त एकच आहे. जो पुजारी आहे, तोच विश्वस्त आहे. तो पुण्याला राहतो. वर्षातून एकदा येतो. आज देखील आला होता. गेली 40 वर्षे मी मंदिराच्या गर्भ गृहात जाऊन रामलल्लांचं दर्शन घेत आलो आहे. पण यावेळी विचित्र वागणूक मिळाली, असेही रामदास तडस यांनी सांगितले.

मंदिरांच्या ट्रस्टमध्ये मोठा भ्रष्टाचार

माझी पत्नी आणि भाजपाचे कार्यकर्ते दर्शनासाठी गेलो होतो. पुजाऱ्याने आणि विश्वस्ताने हेकेखोर पणा दाखवला. वाद निर्माण होऊ नये म्हणून मी वातावरण शांत केले आणि पुजाऱ्याला समज दिली. स्थानिक आमदाराने सुद्धा पुजाऱ्याला समज देऊन मंदिरात तुम्ही मोठं भ्रष्टाचार केला असून या ट्रस्टच ऑडिट लावतो, असं सुनावल्याचे रामदास तडस यांनी सांगितले.

गर्भ गृहात प्रवेशाला नकार...

या विचित्र वागणुकीनंकर स्थानिक गावकरी आले होते. तणाव परिस्थिती निर्माण झाल्याने, तिथं देखील हस्तक्षेप करत गावकऱ्यांना शांत केलं. दरवर्षी या मंदिरात मी गर्भ गृहात जातो त्यांचं दर्शन घेतो आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या गळ्यात हार टाकतो. पण यावेळेस मला विचित्र वागणूक मिळाली. ती वागणूक बरी नव्हती, असे रामदास तडस यांनी आवर्जुन सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com