Phule Movie : फुले चित्रपटात खरंच ब्राह्मणांची बदनामी करणारी दृश्य? छगन भुजबळ काय म्हणाले?

Chhagan Bhujbal, Akhil Bharthiya Brahman Mahasangh : या चित्रपटात नेमकं काय दाखवण्यात आलं आहे त्याची मला कल्पना नाही. परंतु चित्रपटात काय दाखवले आहे ते पाहिलं पाहिजे.
Chhagan Bhujbal on Phule Movie
Chhagan Bhujbal on Phule MovieSarkarnma
Published on
Updated on

Maharashtra Politics : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ११ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर राज्यातील ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेतला आहे.

यासंदर्भात ब्राह्मण संघटनांकडून पोलीस आणि सेन्सॉर बोर्डाला पत्राद्वारे 'फुले' चित्रपटात दाखवण्यात आलेली ब्राह्मण समाजाची बदनामी करणारी दृश्ये हटवूनच हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता यावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal on Phule Movie
Nashik News : राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांना आवर घालण्यासाठी नाशिकचे साधू-महंत एकवटले, केली मोठी मागणी

छगन भुजबळ म्हणाले की, या चित्रपटात नेमकं काय दाखवण्यात आलं आहे त्याची मला कल्पना नाही. परंतु चित्रपटात काय दाखवले आहे ते पाहिलं पाहिजे. संपूर्ण देशात महात्मा फुले यांचा हिंदी चित्रपट दाखविण्यासाठी तयार करण्यात आल्याने त्याचा आंनद आहे. यापूर्वी सत्यशोधक चित्रपट आला होता, तसेच आचार्य अत्रे यांनी देखील एक चित्रपट काढला होता. त्याला भारत सरकारचे एक पारितोषिक देखील मिळालं होतं असं भुजबळांनी सांगितलं. .

भुजबळ पुढे म्हणाले, आता प्रश्न राहिला त्याच्यात ब्राह्मणांना कसं दाखवलं? काय दाखवलं? महात्मा फुलेंनी दलितांना जवळ घेण्याचे काम केले. विशेषतः मुलींना शिक्षणासाठी शाळा काढल्या. त्यावेळी ब्राह्मणांनी जसा विरोध केला, तसा आमच्या बहुजन समाजाने सुद्धा प्रचंड विरोध केला. त्यावेळी अंधश्रद्धा होती आणि ते कर्मठ ब्राह्मण होते. पण त्याच वेळी महात्मा फुलेंनी शाळा काढली, ती प्रथम भिडे ब्राह्मण वाड्यामध्ये होती, असे भुजबळांनी सांगितले.

त्यावेळेला भवाळकर, परांजपे असे अनेक ब्राह्मण महात्मा फुले यांना पाठिंबा देत, सपोर्ट करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूचे लोक होते. ब्राह्मण आणि बहुजन सपोर्ट पण करत होते आणि काही विरोध पण करत होते. लहुजी साळवे हे आपल्या पैलवानासह शाळा बंद करणाऱ्यांना विरोध करत होते. तर हा संमिश्र भाग आहे आणि हे तर खरंच आहे. त्यावेळी खूप दगड मारण्यात आले, खूप विरोध करण्यात आला. मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूची त्याला कंगोरे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी भुजबळांनी हा सिनेमा सगळ्यांनी पाहावा असे आवाहन देखील केले.

Chhagan Bhujbal on Phule Movie
Girish Mahajan : कमरेच्या खाली वार केल्याशिवाय.., गिरीश महाजन खडसेंवर संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com