APMC Washim.
APMC Washim.Google

Washim News : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाची निवडणूक ठरणार रंगतदार

Chairman : शेतकरी विकास, शेतकरी सहकार पॅनलमध्ये चूरस; काँग्रेसकडून मोर्चेबांधणी
Published on

APMC News : सहकार क्षेत्रातील राजकारणालाही वेगळं महत्व आहे. पश्चिम विदर्भातील वऱ्हाडाच्या पट्ट्यात असलेल्या वाशीमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील राजकारण सध्या रंगत आहे. बाजार समितीच्या सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (ता. 14) होत आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल व शेतकरी सहकार पॅनल यांच्या चूरस आहे.

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दामोदर गोटे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. प्रकृतीच्या कारणावरुन दिलेला हा राजीनामा जिल्हा उपबनिबंधकांनी मंजूर केल्यानंतर बाजार समितीच्या सभापतिपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. आता ही निवडणूक गुरुवारी सकाळी 11 वाजता होणार आहे.

APMC Washim.
Washim : शरद पवार गटच नव्हे, महाविकास आघाडीत संचारला जोश

निवडणुकीसाठी सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी जोर लावला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात यावी, यासाठी दोन्ही पॅनलच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यापूर्वी वाशीमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक झाली होती. त्यात 18 संचालक विजयी झाले होते. शेतकरी विकास पॅनलचे 9 सदस्य असून शेतकरी सहकार पॅनलचे 6 संचालक बाजार समितीत आहेत. सभापती आणि उपसभापती पदासाठी 30 मे रोजी निवडणूक घेण्यात आली होती.

निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे दामोदर गोटे हे सभापती झालेत. उपसभापतिपदी गोवर्धन चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. अशातच गोटे यांनी प्रकृती खालावली. बाजार समितीचे काम, न्यायालयीन प्रकरणं आणि सातत्यानं होणारी दगदग सहन होत नसल्याचं कारण नमूद करीत त्यांनी राजीनामा दिला. 5 डिसेंबरला त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. आता या रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. वाशीम जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीने घवघवीत यश मिळवून बाजार समितीवर झेंडा फडकविला होता. या निवडणुकीत काट्याच्या दुरंगी लढतीत शेतकरी सहकार पॅनलने सहा जागांवर विजय मिळवित आपले अस्तित्व सिध्द केले. प्रारंभी तिरंगी वाटणारी ही निवडणूक थेट दुरंगी झाली होती. मार्केट बचाव पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला होता. बाजार समितीच्या निवडणुकीशी जिल्हा परिषदेतील राजकारणाचा थेट संबंध आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेतील नेत्यांनी या निवडणुकीसाठी व्यूहरचना केली आहे.

वाशीम बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात राजगाव उपबाजारही येतो. हरभरा, मूग, तूर, उडीद, सोयाबीनचा व्यापार येथे चालतो. बाजार समितीचे उत्पन्न 2022-23 मध्ये 8,65,25,286 रुपये होते. 4,39,11,462 रुपयांचा खर्च समितीनं केला. बाजारातील आवक 20,54,958 क्विंटल होती. त्याची किंमत 15,80,47,21,900 रुपये होती. 26 गोदामं असलेल्या बाजारात 1, 872 मेट्रिक टन धान्य साठवता येते. 104 व्यापारी व 124 कमिशन एजंट बाजारात कार्यरत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

APMC Washim.
Washim : पुरोगामी विचारांसोबत राहिले असते, तर दादा लोकांचे मुख्यमंत्री झाले असते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com