जी दारू विक्री करण्याचा परवाना आपल्या राज्यात नाही, अशी बाहेरच्या राज्यातील दारू आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न लोक करतात. यासाठी आपली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे चेक पोस्ट आहेत. तेथील अधिकाऱ्यांना आपण अलर्ट मोडवर ठेवलेले आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसोबत आज सायंकाळी बैठक घेणार आहे. त्यामध्ये फ्लाइंग स्कॉड वाढवण्याबाबत चर्चा के जाणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) आज नागपुरात (Nagpur) अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अनधिकृत दारू जी आपल्या राज्यातून बाहेर नेली जाते, त्यासाठीही विभाग अलर्ट मोडवर आहे. त्यासाठी पोलिसांचीही (Police) मदत घेतली जाणार आहे. भरारी पथकं त्यासाठी तैनात केली जाणार आहेत. बनावट दारूसुद्धा परमीट रूममध्ये विकली जाते, याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. त्यासाठी सरप्राईज चेकींग गेले जाणार आहे. दारू तस्करांमध्ये विक्री आणि एरीयावरून गॅंगवॉरच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत. पण यापुढे अशा घटना होणार नाहीत, याकडे सरकारचा कटाक्ष असणार नाही. राज्याचे फ्लाइंग स्कॉड यासाठी आपण तैनात केले आहे. गोव्यातून (Goa) बनावट दारू महाराष्ट्रात (Maharashtra) येते, ती आता बंद केली जाणार आहे, असे मंत्री देसाई म्हणाले.
वाईन शॉप आणि बिअर शॉपीमधून बॉटल विकत घेऊन जाण्याची परवानगी आहे, पण तेथेच प्राशन करण्याची परवानगी नाही. परंतु काही वेळा याबाबतीतच्या तक्रारी येतात. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कर्मचारी कमी आहेत, त्यामुळे ज्या बिटमध्ये असे प्रकार होतात, तेल पोलिसांची मदत आम्ही घेऊन हे प्रकार पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असा प्रकारामुळे गुंड प्रवृत्ती बळावते कारण असे लोक हे प्रकार करतात आणि त्यांचा बंदोबस्त पोलिसच करू शकतात.
३ डिसेंबरलाच मी आणि चंद्रकांत पाटील बेळगावला जाणार होतो आणि तेथील ३६५ गावांतील लोकांना महाराष्ट्राकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेणार होतो. त्यांना शैक्षणिक, आरोग्य विषयी मदत देण्याचा निर्णय आपण यापूर्वीच केला आहे. आता त्यांना यापेक्षा अधिक काय अपेक्षा आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आता आल्यापेक्षा ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या. त्यामुळे आम्ही जाण्याचे पुढे ढकलले. दौरे कळवले ऑफीशिअली सूचना दिल्या. पण कर्नाटक सरकारने त्याला वेगळे वळण दिले.
आम्ही जायच्या अगोदरच त्यांनी बंदोबस्त वाढवला, चेक पोस्टवर शेकडो पोलिस तैनात केले तेथील आपल्या मराठी भाषिक लोकांना नोटिसा देणे सुरू केले. एकाएकी त्यांनी तणाव वाढवला. त्यामुळे आम्ही माघार घेतली. कारण तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होता आणि आमच्यामुळे त्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये. दोन मंत्री आले आणि कार्यक्रमाला व्यत्यय आला, असे होऊ नये, म्हणून तेव्हा आम्ही थांबलो आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशन आले. आता अधिवेशन संपल्यानंतर मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील बेळगावला जाणार आहोत, असेही मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.