Eknath Khadse News : खडसेंच्या घरात राजकारण; सासू विरुद्ध सून मैदानात

Eknath Khadse : सासू-सासऱ्यांच्या पॅनल विरूध्द सुनेचा प्रचार
Eknath Khadse and Raksha Khadse
Eknath Khadse and Raksha Khadse Sarkarnama

Eknath Khadse : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आता प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. सासू-सासऱ्यांच्या पॅनल विरूध्द सुनेचा प्रचार सुरू असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) व शिंदे गट मैदानात आहेत.

काँग्रेस Congress, राष्ट्रवादी (NCP), शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल आहे. तर भाजप-शिंदे गट प्रणित मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल आहे. खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असल्याने त्या भाजपप्रणित पॅनलचा प्रचार करीत आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलविरूध्द मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील (Gulab Patil) यांच्यात लढत आहे. दोन्ही पॅनलचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकनाथ खडसे प्रत्यक्ष मैदानात नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी व जिल्हा दूध संघाच्या विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे मैदानात आहेत.

Eknath Khadse and Raksha Khadse
Mumbai Fraud News : भाजप नेते आशिष शेलारांच्या नावे फसवणूक, दोन जणांना अटक

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला राम-राम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी त्यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपमध्येच असून त्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. जिल्हा दूध संघात सासू मंदाकिनी खडसे व सासरे एकनाथ खडसे यांचे सहकार पॅनल आहे. परंतु पॅनल विरूध्द त्या भाजप-शिंदे गटाच्या मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलकडून प्रचार करीत आहेत.

Eknath Khadse and Raksha Khadse
या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेले; खोक्यांची व्यवस्थाही : शिवसेनेच्या दाव्याने खळबळ

मुक्ताईनगर मतदार संघात शेतकरी पॅनलच्या झालेल्या मेळाव्यात खासदार रक्षा खडसे यांनी व्यासपीठावरून भाषण करतांना शेतकरी पॅनलला विजयी करण्याचे आव्हान केले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ''मला सहकार क्षेत्राचा जास्त अनुभव नसल्याने त्या सदंर्भात मला जास्त बोलता येणार नाही, शेतकऱ्यांना मजबूत करायचे असेल तर एक चांगल व्यवस्थापन जिल्हा दूध संघावर देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी विकास पॅनलला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या'', असे अवाहनही त्यांनी केले आहे.

Eknath Khadse and Raksha Khadse
Jalna : शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढाल तर तुमच्या शंभर पिढ्या बरबाद होतील..

दरम्यान, जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलीय. तर सासू विरोधात सुनेच्या प्रचाराची लढाई राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे. जळगाव जिल्हा निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com