प्रसन्न जकाते | जयेश गावंडे
Akola Political News : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या टोपी किंवा फेट्यांच्या माध्यमातून वेगवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतात. इतकेच काय तर अशाप्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने ‘सॅल्यूट’ची तऱ्हा बदलूनही त्यांनी पुढे काय करणार याचे संकेत राजकीय विश्लेषकांना दिले आहेत.
त्यामुळे मोदींच्या टोपी, फेटा व सॅल्यूटच्या तऱ्हांची चर्चा नेहमीच रंगते. अशीच चर्चा अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणूक व सभेदरम्यान बुधवारी रंगली होती.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भीमसागराला अकोल्यात संबोधित करतात. सभेपूर्वी शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात येते. यंदाही ही मिरवणूक काढण्यात आली.
फुलांनी सजविलेल्या वाहनावर अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि काही पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीला सुरुवात झाली, त्या क्षणापासूनच त्यांनी डोक्यावर परिधान केलेल्या फेट्याची चर्चा सुरू झाली.
अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी बंजारा तांड्यांचा दौरा केला. आगामी लोकसभा निवडणुकीत बंजारा समाजाची मतंही तितकीच महत्त्वाची असल्यानं आंबेडकर यांनी बंजारा समाजाचा फेटा परिधान केल्याची चर्चा सुरुवातीला रंगली. अनेकांनी एकमेकांना याबद्दल विचारणा केली.
व्हॉट्स अॅपवर प्रकाश आंबेडकर यांचे फोटो पाठवून खात्रीही करण्यात आली. नंतर चर्चा रंगली की हा फेटा एक तर मारवाडी समाजाचा असावा किंवा राजस्थानी, काठीयावाडी. धम्मचक्र प्रवर्तन दिनाची मिरवणूक सभास्थळी येईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या आणि मिरवणुकीसोबत चालणाऱ्या अनेकांमध्ये या फेट्याबाबत चांगलीच चर्चा होती.
डोक्यावरील फेट्याच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांना काही संदेश द्यायचा आहे काय, यावर अनेकांचे विचारमंथन सुरू होते. सभेच्या ठिकाणीही इतर विषयांसह बाळासाहेबांचा फेटा अधिकच चर्चिला जात होता. परंतु ठामपणे हा फेटा नेमका कशाचा, कोणत्या समाजाचा व कोणता संदेश देणारा या निष्कर्षाप्रत कुणीही पोहोचू शकले नाही. (Vanchit Bahujan Aaghadi)
अनेकांची सभेच्या ठिकाणावरून परत येतानाही याच मुद्द्यावर चर्चा कायम होती. जो तो आपापल्या पद्धतीने बाळासाहेबांना नेमका संदेश तरी काय द्यायचा होता, याचाच विचार करत होता, पण वेगवेगळ्या समाजातील लोकही या फेट्याबद्दल ठामपणे काहीही सांगू शकले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या भाषणातून, देहबोलीतून आणि या फेट्याच्या माध्यमातूनही अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत असणाऱ्यांना व विरोधकांना द्यायचा होता तो नेमका संदेश संबंधितांपर्यंत पोहोचला असल्याची चर्चा आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.