Nana Patole on Parliament Session : संसदेचे विशेष अधिवेशन कशासाठी ? मुंबई, विदर्भाबाबत पटोलेंकडून संशयाचा बॉम्ब

Maharashtra Congress : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा कोणताही अजेंडा केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही.
Nana Patole on Parliement Session
Nana Patole on Parliement Session Sarkarnama
Published on
Updated on

Gondia Political News : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा कोणताही अजेंडा केंद्र सरकारने जाहीर न केल्यामुळे या अधिवेशनात काय होणार, कोणते निर्णय घेणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीला कमजोर करण्यासाठी तर आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. असे असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

येणाऱ्या दिवसांत विदर्भ वेगळा होऊ शकतो आणि मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर विदर्भ वेगळा करून मुंबईतील सर्व उद्योग गुजरातला हलविण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Nana Patole on Parliement Session
Kishori Pednekar ED Enquiry: किशोरी पेडणेकर चौकशीसाठी 'ईडी'च्या कार्यालयात दाखल

तसेच, काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याची इच्छा असलेल्या लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड नाराजी आहे. पुढील निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर आणि राज्यातही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

'महाराष्ट्रातील लोक महात्मा फुले, छत्रपती शाहू आणि बीआर आंबेडकर यांच्या विचारसरणीचे अनुयायी आहेत. ते भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांना कंटाळले आहेत. असही त्यांनी नमूद केलं. याशिवाय मराठा आरक्षणावरून सध्या सुरू असलेल्या वादावरूनही पटोले यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले.

भाजपने खऱ्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. ओबीसी आणि मराठा समाजात वाद पेटवण्याचे पाप भाजपने केले. पण आज भाजपविरोधात लोकांमध्ये तीव्र नाराजी असून, आता लोकांना सरकारमध्ये बदल हवा आहे. काँग्रेस पुढच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवेल आणि तरुण नेत्यांना तयार करायचे असल्याने नवीन चेहरे उभे करण्यास प्राधान्य देईल, असं आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

Edited By- Anuradha Dhawade

Nana Patole on Parliement Session
Bawankule on Jarange Patil : सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेतील, बावनकुळेंना विश्‍वास !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com