Akola Politics : काहीही झाले तरी अकोल्यातून काँग्रेसचाच खासदार दिल्लीत जाणार

Congress Meeting : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole in Akola : भाजपविरोधात लढण्यासाठी प्रामाणिकपणे काँग्रेससोबत कुणी येत असेल, तर त्यांचे स्वागत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आघाडीत येण्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही त्यांच्यासोबत चर्चेस तयार आहोत. परंतु काहीही झाले तरी अकोल्यातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी होऊन दिल्लीत जाईल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला. (Whatever happens, the Congress MP from Akola will win the election and will go to Delhi)

वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबतच्या युतीसंदर्भात अकोल्यात शुक्रवारी (ता. २७) पटोले म्हणाले की, अॅड. आंबेडकरांबाबत आम्हाला केवळ माध्यमातून माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्ण तयारी आहे. चर्चा ‘वंचित’ला करायची आहे. काँग्रेसचा उमेदवारही ठरवला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावाही या वेळी नाना पटोले यांनी केला आहे.

अकोल्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन मेळाव्यात सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसने अॅड. प्रकाश आंबेडकर यांना आजमावून पाहावे. आम्ही भाजपचा अख्खा बाजार उठवू, असे वक्तव्य केले होते. यावर पटोले म्हणाले, कुणी काही म्हणत असले तरी अकोल्यातून लोकसभेत काँग्रेसचाच उमेदवार जाईल हे पुन्हा सांगतो. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वीच ते स्वतः अकोला लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पटोले यांच्या बोलण्यावर वंचित बहुजन आघाडी काय प्रतिक्रिया देणार याची प्रतीक्षा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही पदाधिकाऱ्यांचे कान टोचले

काही दिवसांपूर्वी प्रदेश पातळीवरील दोन नेते एकमेकांच्या अंगावर जाईपर्यंत आपसांत भिडले होते. बंदुकीने उडविण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्याचीही दखल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली. यावर बोलताना पटोले यांनी सांगितले की, दोन्ही पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोघांमध्ये बंदूक निघालीच नसल्याचा दावाही त्यांनी केला. आपण आल्यापासून अकोला काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचेही पटोले ठामपणे म्हणाले. अकोल्यातच काय, पण राज्यातील काँग्रेसमध्ये कुठेही कुणातही वाद नाही असा दावा त्यांनी केला. देशभरात मोदी विरोधात लाट आहे. राहुल गांधी यांना जनाधार वाढत आहे. त्यामुळे काही विघ्नसंतोषी लोक आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

जेलभरो आंदोलन करणार

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकार विरोधात राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसकडून यासंदर्भात तयारी सुरू आहे. अकोल्यातही या आंदोलनाला प्रतिसाद मिळेल, असे नाना पटोले यांनी नमूद केले.

(Edited By : Prasannaa Jakate)

Nana Patole
Prakash Ambedkar in Akola : ''नेत्यांची परिस्थिती अशी झाली आहे की,....'' प्रकाश आंबेडकरांचं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com