Ladki Bahin Yojana : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेल्या बहि‍णींना पैसे कधी मिळणार? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या अनेक महिलांना अद्याप या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. ते पैसे कधी मिळणार याची काळजी लाडक्या बहिणींना लागून राहिली आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis
Mukhyamantri Ladki Bahin Yojana, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महायुती (Mahayuti) सरकारसाठी महत्वकांशी असलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. या योजनेवरून राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलं आहे.

या योजनेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतुद केली आहे. महिलांनी देखील या योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. पात्र महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसेही जमा झाले आहेत.

दरम्यान, काही महिलांचे अर्ज विविध कारणामुळे रखडले होते. त्यांचे अर्ज भरण्यासाठी सरकारने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या अनेक महिलांना अद्याप या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. ते पैसे कधी मिळणार याची काळजी लाडक्या बहिणींना लागून राहिली आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis
Ajit Pawar News : 'दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही'; अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक

अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे पैसे कधी मिळणार याबाबतची माहिती दिली आहे. नागपूमध्ये बांधकाम कामगार मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, "वर्षाला अकरा हजार रुपये म्हणजेच महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहि‍णींना देत आहोत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे या (सप्टेंबर) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ. तसंच, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ," असं ते म्हणाले.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis
Sharad Pawar : तिकीटवाटपाचा 'फॉर्म्युला' काय? जागावाटप कधी पूर्ण होणार? शरद पवारांनी सांगूनच टाकलं

दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेसने (Congress) या योजनेला विरोध केला तरीही आम्ही योजना लागू केल्याचं सांगितलं. ते म्हणाले, या योजनेविरोधात काँग्रेस कोर्टात गेलं पण आम्ही कोर्टात सांगितलं की, या योजनेसाठी आम्ही बजेटमध्ये पैसा ठेवलेला आहे. आधीच्या योजनांना स्थगिती दिलेली नाही, काँग्रेसने कितीही विरोध केला तरीही या योजना बंद होणार नाही, हा शब्द मी देतो, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com