Nitin Gadkari: 2029 मध्ये कुठे असणार...? मंत्री नितीन गडकरींचे मोठे संकेत; म्हणाले, पिक्चर अभी बाकी है...

Nitin Gadkari On Narendra Modi : अकरा वर्षांपासून मोदी पंतप्रधान आहेत. पुढली लोकसभेची निवडणूक २०२९मध्ये होणार आहे. त्यानंतर मोदी निवृत्त होतील आणि भाजप नवा पंतप्रधान देतील अशी राजकीय चर्चा आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मोदी सरकारने 11 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरी ओळखले जातात. मोदी यांच्या नंतरचे पंतप्रधान कोण असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो तेव्हा गडकरी यांचे नाव घेतले जाते. आज एका प्रकट मुलाखतीत 2029 मध्ये तुम्ही कुठल्या रुपात आम्हाला बघायला मिळणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पिक्चर अभी बाकी है... असे उत्तर देऊन सर्वाचीच उत्सुकता वाढवली.

‘मोदी सरकार, ग्यारह साल बेमिसाल' या कार्यक्रमांतर्गत आज नागपूरमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. विदर्भाने सर्वाधिक मौल्यवान या देशाला जी भेट दिली आहे त्यात गडकरी यांचा समावेश आहे असे निरगुडकर म्हणाले.

प्रत्येक राज्यातील नेते गडकरी यांनी आम्हाला सर्वाधिक निधी दिला, सर्वाधिक रस्ते व उड्डाणपूल करून दिले असे सांगतात. यातून त्यांची देशभरातील लोकप्रियता दिसून येते. गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तेव्हापासूनच त्यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून बघितले जात होते. मात्र ही संधी त्यांना मिळाली नाही.

अकरा वर्षांपासून नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान आहेत. पुढली लोकसभेची निवडणूक २०२९मध्ये होणार आहे. त्यानंतर मोदी निवृत्त होतील आणि भाजप नवा पंतप्रधान देतील अशी राजकीय चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निरगुडकर यांनी 2029 मध्ये तुम्ही कुठल्या रुपात आम्हाला दिसणार असा प्रश्न त्यांना केला.

Nitin Gadkari
Amruta Fadnavis: उद्धव ठाकरेंच्या 'कम ऑन किल मी...' या टीकेवर अमृता फडणवीस म्हणतात, आपला देश शांतताप्रिय...

यावर ‘अभी जो हुवा वो रिल थी, असली फिल्म अभी शुरू होना बाकी है...‘असे उत्तर गडकरी यांनी दिले. त्यानंतर गडकरी यांनी लगचे पक्ष जी भूमिका देईल ते काम करू असे स्पष्ट केले. मी तृप्त आहे अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

रस्ते व बांधकाम क्षेत्रात भरपूर काम केले. अलीकडे मी शेतीकडे जास्त लक्ष हेतो. विदर्भात एकाही शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी काम करायचे असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com