जय भीमचा जयघोष करताना, आजही हातावर पोट घेऊन जगणारे लोक आहेत...

मी अर्थमंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या लंडन येथील निवासस्‍थानासंदर्भात ४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्‍याचा योग मला प्राप्‍त झाला. असे आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
MLA Sudhir Mungantiwar
MLA Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान भारतमातेच्‍या चरणी अर्पण केले, या देशाला समर्पित केले. समाजाच्या तळागाळातील व्‍यक्‍तीच्‍या चेह-यावर आनंद फुलवावा, हे त्‍यांचे संविधानाच्‍या निर्मीतीमागे स्‍वप्‍न होते. पण आज जय भीमचा जयघोष करताना हातावर पोट घेवून जगणा-या व्‍यक्‍तींना विवंचनांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या स्‍वप्‍नांची पूर्तता करण्‍यासाठी झटणे हेच आपले कर्तव्‍य आहे, असे लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्‍या जयंतीदिनानिमीत्‍त चंद्रपूर (Chandrapur) नहानगरपालिकेसमोर आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले, स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात जेव्‍हा आपण चिंतन करतो तेव्‍हा आजही आज जय भीमचा जयघोष करताना बाबासाहेबांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी आम्‍हाला प्रयत्‍नांची शर्थ करायची आहे किंबहुना हे आपले कर्तव्‍य आहे. मी अर्थमंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या लंडन येथील निवासस्‍थानासंदर्भात ४० कोटी रू. निधी मंजूर करण्‍याचा योग मला प्राप्‍त झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १२५ व्‍या जयंतीनिमीत्‍त १२५ कोटी रू. निधीची तरतूद करण्‍याचे सौभाग्‍य मला लाभले, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

चंद्रपूरच्‍या पवित्र दीक्षाभूमीवर २ कोटी रूपये निधी खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम केले. नुकताच या भवनात वॉटर कुलर, वातानुकुलीकरण, साऊंड सिस्‍टीम आदींसाठी ५० लक्ष रूपये निधी मंजूर करवून घेतला. विरोधी पक्षात असतानादेखील या प्रक्रियेत मी योगदान देवू शकलो, याचा मला आनंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजावर मोठे उपकार आहे. आपण त्‍यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ जे ही काही करू ते कमीच असल्‍याची भावना त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

MLA Sudhir Mungantiwar
मुनगंटीवार म्हणाले, सत्ता मे जो आये है, जरा याद करो इनकी बेईमानी…

माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्‍या भाषणात सांगीतले की सामाजिक समरसतेचा सुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव तळपत ठेवला. सर्वसामान्‍य जनतेला त्‍यांच्‍या हक्‍काची जाणीव व्‍हावी, यासाठी संविधानाच्‍या माध्‍यमातून मोठा ग्रंथ त्‍यांनी या देशाला दिला. यावेळी भाजप चंद्रपूरचे अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती अध्‍यक्ष संदीप आवारी, महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, रवि गुरनुले, महिला मोर्चा अध्‍यक्ष अंजली घोटेकर, युवा मोर्चा अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, सभागृह नेत्‍या जयश्री जुमडे, गटनेते देवानंद वाढई, मनपा सदस्‍य राहूल घोटेकर, छबू वैरागडे, राजीव गोलीवार, रवि आसवानी, संजय कंचर्लावार, डॉ. दीपक भट्टाचार्य, सविता कांबळे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com