Cricketnama 2023: 'क्रिकेटनामा'चे मैदान कोण मारणार ? शिंदे, फडणवीस, अजितदादा की, ठाकरे, पवार

Sarkarnama Political Cricket Competition : 'सरकारनामा’च्या ‘क्रिकेटनामा’ स्पर्धेत दिग्गज नेते आपापले संघ घेऊन रणांगणात उतरणार आहेत.
Sarkarnama Political Cricket Competition
Sarkarnama Political Cricket Competition Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) : विधिमंडळ अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष असतानाच 'सरकारनामा'ने भरविलेल्या `क्रिकेटनामा`कडेही राजकीय वर्तुळाचे तेवढेच लक्ष लागले आहे. या स्पर्धेची अर्थात, पद्मभूषण (डॉ.) बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी सज्ज झाली आहे. राजकारणाच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी करणारे दिग्गज आपापले संघ घेऊन क्रिकेटनामाच्या या रणांगणात उतरणार आहेत.

'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'कडून पुढील दोन दिवस म्हणजे 11 आणि 12 डिसेंबर रोजी या स्पर्धा होतील. सोमवारी (ता.11) दुपारी चार वाजता स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहतील.

Sarkarnama Political Cricket Competition
Cricketnama 2023 : उपराजधानीत सोमवारपासून नेतेमंडळी मैदानात भिडणार; 'क्रिकेटनामा'ची उत्कंठा शिगेला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे नागपुरातील वातावरण ऐन हिवाळ्यात तापले असतानाच आता `क्रिकेटनामा`मुळे ते अधिकच तापणार आहे. राज्याच्या उपराजधानीत प्रथमच होत असलेल्या क्रिकेटनामाच्या चषकावर आपले नाव कोरण्यासाठी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), बच्चू कडूंची प्रहार संघटना व इतर संघ जोरदार तयारीनिशी मैदानात उतरणार आहेत.

राजकारणात एकमेकांना धोबीपछाड देणारे राजकीय नेते व त्यांचे आमदार, मंत्री, समर्थक विरोधकांना धूळ चारण्यासाठी सरसावले आहेत. प्रत्येक संघाने विरोधी संघाला पराभूत करण्यासाठीची रणनीती आखली असून, प्रत्यक्ष मैदानात ती किती यशस्वी ठरते ? यावरच क्रिकेटनामाच्या चषकावर कोणता संघ आपला हक्क सांगणार हे ठरणार आहे.

अशा होतील लढती...

क्रिकेटनामासाठी एकूण दहा टीम मैदानात उतरणार आहेत. 11 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पहिला सामना..

- बीजेपी किंग्ज (देवेंद्र फडणवीस) विरुद्ध काँग्रेस वॉरियर्स : दुपारी 4 वाजता

- शिवसेना टायगर्स (उद्धव ठाकरे) विरुद्ध मनसे चॅलेंजर्स (राज ठाकरे) 4.30 वा.

- एनसीपी (एसपी) लिजेन्डस (शरद पवार) विरुद्ध एनसीपी नागपूर कॅपिटल्स (अजित पवार) सायंकाळी 5 वा.

- शिवसेना रायडर्स (एकनाथ शिंदे) विरुद्ध एनसीपी (एपी) लाॅयन्स (अजित पवार) 5.30 वा.

- प्रहार फायटर्स (बच्चू कडू) विरुद्ध सरपंच टायटन्स 6 वा.

पहिल्या सामन्यात जिंकणारे संघ, दुसऱ्या दिवशी उपांत्य फेरीत खेळतील. यातून जे दोन संघ जिंकतील, त्यांचा अंतिम सामना ता.12 रोजी होणार आहे.

राज्यभरात क्रिकेटनामाची चर्चा...

सर्व राजकीय पक्षांना एकाच मैदानावर आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने 'सरकारनामा'च्या वतीने क्रिकेटनामा महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. या राजकीय क्रिकेट सामन्यांना भरभरून प्रतिसाद मिळत असून, राज्याच्या राजकारणात या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेची चर्चा आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवल्यामुळे त्यांच्या समर्थकांसह सर्वसामान्य नागपूरकरांनाही क्रिकेटनामाची उत्सुकता लागली आहे.

(Edited by-Ganesh Thombare)

Sarkarnama Political Cricket Competition
Supreme Court: कलम 370 रद्दचा निर्णय योग्य की अयोग्य ? सुप्रीम कोर्ट सोमवारी देणार अंतिम फैसला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com