राज्यभर गाजलेल्या मोहाडी नगरपंचायतीवर सत्ता कुणाची? जनता संभ्रमात...

भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या ४ नगरसेवकांचा एक गट तर माजी आमदार भाजप नेते चरण वाघमारे यांच्या ५ नगरसेवकांचा दुसरा गट.
Mohadi NP Parinay Fuke
Mohadi NP Parinay FukeSarkarnama

भंडारा : राज्यभर गाजलेल्या मोहाडी नगर पंचायतीमध्ये भाजप बहुमतात असतानासुद्धा काल झालेल्या सभापतिपदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला ३ महत्वाची सभापतिपद दिली गेल्याने मोहाडी नगर पंचायतीवर सत्ता कुणाची भाजप की राष्ट्रवादीची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि त्यांनाही हे कोडे उलगडेनासे झाले आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात मोहाडी नगरपंचायतीची निवडणूक सुरुवातीपासून वादाचा भोवऱ्यांत अडकली होता. सतत या ना त्या कारणांनी ही नगरपंचायत (Nagar Panchayat) चर्चेत राहिली आहे. भाजपला (BJP) या नगर पंचायतीत बहुमतात सत्ता मिळाली. १७ पैकी ९ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. मात्र यात भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या ४ नगरसेवकांचा एक गट तर माजी आमदार भाजप नेते चरण वाघमारे यांच्या ५ नगरसेवकांचा दुसरा. अशा दोन्ही गटांनी नगराध्यक्षपदावर दावा केल्याने वाद अधिक तीव्र झाला होता. मात्र हा वाद नागपूर (Nagpur) येथील धरमपेठ बंगल्यावर गेल्याने मध्यस्थी करून दोन्ही गटांत दिल जमाई झाली.

दोन्ही गट बहुमतात आल्यावर मोहाडी नगरपंचायतीवर भाजपने सत्ता स्थापन केली. आता वाद मिटला सर्व सुरळीत होईल, असे वाटत असताना पदग्रहण केल्यानंतर ४ नगरसेवकांचा गट माजी आमदार चरण वाघमारे यांना भेटायला गेला. तेथे त्यांच्यात पुन्हा त्याच्यात वाद होऊन मतभेद निर्माण झाले. हे मतभेद शिगेला पोहोचल्याने काल झालेल्या नगरपंचायत विषय समितीच्या निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत कलहाचा लाभ राष्ट्रवादीला झाला. भाजपला बहुमतात असतानाही चार समित्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्वपूर्ण असे बांधकाम समिती सभापती व पाणीपुरवठा सभापती मिळाले. यात विशेष बाब अशी की, नाराज भाजपच्या चारच्या गटातील नगरसेवक मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले.

Mohadi NP Parinay Fuke
नाना पटोलेंची मानसिक स्थिती ढासळलेली आहे : भाजप आमदार परिणय फुके,पाहा व्हिडिओ

चरण वाघमारे यांच्या ५ नगरसेवकांचा गट एकाकी पडला. त्यामुळे विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचा ६ नगरसेवकांच्या गट वरचढ ठरला. विशेष म्हणजे काँग्रेसचे दोन नगरसेवक तटस्थ राहिल्याने राष्ट्रवादीची शक्ती अधिक वाढली. त्याचा परिणाम म्हणून की काय आपण जिंकू शकत नाही, हे चरण वाघमारे गटाने ओळखले अन् राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सोबत दिलजमाई करून अखेर विषय समितीत सभापती पद मिळविले. त्यामुळे मोहाडी नगरपंचायत विषय समित्यांमध्ये बांधकाम सभापती राष्ट्रवादीचे सचिन गायधने, पाणी पुरवठा समिती सभापती राष्ट्रवादीचे पवन चव्हाण, आरोग्य व वैद्यकीय सभापतिपद भाजपच्या दुसऱ्या गटाचे व उपाध्यक्ष असलेले शैलेश गभने, महिला व बालकल्याण सभापती माजी आमदाराच्या गटाचे व भाजपच्या सविता साठवणे यांना मिळाले. तर स्वीकृत सदस्य म्हणून माजी आमदार वाघमारे यांचे विश्वासू व भाजपचे सेवक चिंधालोरे व राष्ट्रवादीचे नेते असले तरी चरण वाघमारे यांच्या विकास फाउंडेशन संघटनेचे शहरअध्यक्ष लाला तरारे यांना देण्यात आले आहे.

आता मुख्य प्रश्न असा आहे की, बहुमत असतानासुद्धा भाजपचे चार नगरसेवक तटस्थ का राहिले. सर्व चारही विषय समित्यांचे पद भाजपला आयते मिळाले असताना राष्ट्रवादीला सभापती पद कसे गेले. या सर्व प्रश्नांचे संशोधन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून होणे गरजेचे आहे. मोहाडी नगर पंचायतीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हाला मतदान करून बहुमतात निवडून देणाऱ्या मतदारांशी हा दगा नाही का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रकाराचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्की भोगावे लागणार, असे जाणकारांचे मत आहे.

आता मोहाडी नगरपंचायतीमध्ये तयार झालेल्या राजकीय खिचडीने राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्या असून मोडाडी नगरपंचायतीवर खरच सत्ता कुणाची भाजपची राष्ट्रवादीची, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बहुमतातील नगर पंचायतीच्या हिशोबातून मोहाडी नगर पंचायतीला बाद केले तर नवल वाटायला नको.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com