Nagpur Ambedkar Bhavan News : आंबेडकर भवन पाडण्यासाठी परवानगी कुणाची? एमटीडीसीचे अधिकारी येणार अडचणीत !

Ambazari : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची इमारत वादळाने पडली नाही.
Ambedkar Bhavan, Nagpur.
Ambedkar Bhavan, Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

In case of investigation, there is a possibility of revealing shocking information : अंबाझरी तलाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची इमारत वादळाने पडली नसून ती पाडण्यात आल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांच्या चौकशी समितीने दिला. त्यामुळे ही इमारत कुणाच्या परवानगीने व कुणी पाडली, असा सवाल उपस्थित होत आहे. (The report of the demolition was given by the inquiry committee of the Divisional Commissioner)

या प्रकरणाची चौकशी झाल्यास धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबाझरी येथील ४४ एकर जागेमधील २४ एकर जागा तलाव व २० एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी राखीव असल्याचा दावा आंदोलन करणाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या जागेचे आरक्षण बदलून ही संपूर्ण जागा एमटीडीसीला विकासासाठी देण्यात आली.

एमटीडीसीने ही जागा गरुडा ॲम्युझमेंट पार्क कंपनीला लीजवर दिली. गरुडा कंपनीने संपूर्ण भवन पाडले. याचा विरोध नागपुरातील (Nagpur) आंबेडकरी जनतेकडून झाला. त्यानंतर भवनाची इमारत वादळाने पडल्याचा दावा विकासक कंपनी गरूडा व एमटीडीसीकडून करण्यात आला. परंतु ही इमारती पाडण्यात आली असून गरुडा कंपनीचा करार रद्द करून २० जागा आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले.

गेल्या अनेक महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी गरुडा कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. इमारत पडल्याच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने (State Government) विभागीय आयुक्तांना दिले. विभागीय आयुक्तांनी २२ ते २५ पानांचा विस्तृत अहवाल तयार करून शासनाला सादर केला. यात त्यांनी इमारत वादळाने पडली नसून पाडण्यात आल्याला निष्कर्ष दिला.

Ambedkar Bhavan, Nagpur.
Nagpur ZP News : सभापतींनी फर्निचर घरी नेल्याचे प्रकरण : चर्चा न होऊ देण्यासाठी कुणी केले प्रयत्न ?

या अहवालाच्या आधारे प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. परिसरात इमारत असल्याने ती पाडण्यासाठी एमटीडीसीची किंवा मनपाची (Municipal Corporation) परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे इमारत पाडण्यासाठी कुणाची परवानगी होती, कंपनीने विना परवानगी इमारत पाडली, विना परवानगी इमारत पाडली तर एमटीडीसी काय पावले उचलली, असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

एमटीडीसीचे अपयश..

विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालात एमटीडीसीवरही ठपका ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण हाताळण्यात एमटीडीसीला अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणी एमटीडीसीचे अधिकारी अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com