Grampanchayat Election News: विकासाचे ‘व्हिजन’ असलेले सरपंच जनतेला मिळतील का ?

Nagpur District : हिंगणा विधानसभा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे गाव म्हणजे रायपूर आहे.
Nagpur
NagpurSarkarnama

Grampanchayat Election News : नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रायपूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसचे (Congress) माजी जिल्हा परिषद सत्ता पक्ष नेते बाबा आष्टणकर भाजपसोबत (BJP) तर काँग्रेसचा दुसरा गट जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आजपर्यंत झालेला गावाचा विकास पाहता नवे विकासाचे व्हिजन असलेला सरपंच मिळणार का, असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

हिंगणा विधानसभा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे गाव म्हणजे रायपूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग (Rameshandra Bang) यांचे हे गाव आहे. १८ डिसेंबरला ग्रा.पं.निवडणूक आहे. सरपंचपदाची (Sarpanch) थेट निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) शिवसेना व काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. रायपूर ग्रामपंचायतीत १७ सदस्यसंख्या असून सरपंचपदाची थेट निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीत जवळपास ८ हजारांच्या घरात मतदारांची संख्या आहे. भाजप व काँग्रेसच्या बाबा आष्टणकर गटाने सरपंच पदासाठी युवा नेते उमेश आंबटकर यांना रिंगणात उतरविले.

राष्ट्रवादी काँग्रेस व विठ्ठलराव कोहाड गटाने माजी उपसरपंच दीपावली कोहाड यांना मैदानात उतरविले आहे. भाजपच्या काळात उमेश आंबटकर यांनी रायपूर वेणा नदी खोलीकरण केले. गावातील दोन मुख्य रस्ते प्रशस्त केले. गावाच्या विकासाचे व्हिजन त्यांनी तयार केले.यामुळेच रायपूर ग्रामपंचायत निवडणूकीत नवा चमत्कार घडेल असा दावा आमदार समीर मेघे यांनी केला आहे. कॉंग्रेसचे माजी जि.प.सत्तापक्ष नेते बाबा आष्टणकर यांचाही भक्कम पाठींबा त्यांना आहे. या जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कुंदा राऊत व कोहाड गटाच्या सरपंच पदाचे उमेदवार दिपावली कोहाड यांनी पाच वर्ष उपसरपंच म्हणून काम केले आहे. त्यांचे पती स्व.संदीप कोहाड यांनी जनतेचा विश्वास संपादन केला होता. यामुळे भावनीक साद मिळण्याची शक्यता आहे.

Nagpur
Aurangabad : जिल्ह्यात चौदा सरपंच अन् ३०८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध..

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचाही भक्कम पाठींबा त्यांना आहे. रायपूर ग्रामपंचायतला फारसे महसुली उत्पन्न नाही. पाणीपुरवठा योजनेचे बील देताना दमछाक होते. नागनदी व वेणा नदीच्या मधोमध गाव वसले आहे. आता विस्तारिकरणासाठी वाव नाही, अशा परिस्थितीत ग्रामपंचायतचा डोलारा सांभाळण्यासाठी नवे विकासाचे व्हिजन असलेला सरपंच निवडून येणे अपेक्षित आहे. मात्र मतदार राजा कुणाला पसंती देतो,हे येणारी वेळेचं सांगेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com