Congress Politics : थोरातांची नाराजी दुर करणार? पटोलेंनी दिलं उत्तर...

थोरात यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे
Nana Patole | Balasaheb Thorat
Nana Patole | Balasaheb Thorat ANI
Published on
Updated on

Nana Patole On Balasaheb Thorat : काँग्रेसचे ज्यष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (०७ फेब्रुवारी) विधानसभा पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. थोरात यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे थोरातांमुळे राजीनामा दिल्याच्याही चर्चा आहेत.

दरम्यान थोरात यांची नाराजी दूर करणार का, असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. पण त्यांनी थोरातांच्या प्रश्नाला बगल देत 15 फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीचे थोरांताना निमंत्रण दिल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. पण त्यांची मनधरणी करण्याचा किंवा त्यांची नाराजी दूर करण्याबाबत पटोलेंनी कोणतीही स्पष्टोक्ती केली नाही.

Nana Patole | Balasaheb Thorat
CM Fellowship Program : शिंदे-फडणवीस सरकारसोबत काम करायचं ? ; तर मग हे वाचाच

पण त्याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. विधानपरिषद निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. तांबे कुटुंबातील कौटुंबिक वादाचं भाजपने राजकारण केलं. पण सत्तापिपासू भाजपला निवडणुकीत जनतेने धडा शिकवला. अशी टीकाही नाना पटोलेंनी केली. तसेच, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम भाजप काम करते, असाही आरोपही त्यांनी यावेळी केला.

विधान परिषदेतील नाट्यमय घडामोडींनंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेत थोरातांनी पटोलेंबाबत नाराजी उघडपणे जाहीर केली होती. पण त्यांच्या राजीनाम्यामुळे ही नाराजी अगदी टोकाला गेल्याचंही म्हटलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com