Winter Session : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. खडसे यांनी फडणवीसांना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्दयावर डिवचले. फडणवीसांनी स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्नच करणार नाही, अशी घोषणा केली होती. या घोषणेचं काय झालं? असा प्रश्न विचारला होता. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खडसे यांच्या डिवचणाऱ्या प्रश्नावर फडणवीसांनीही तसेच प्रत्युत्तर दिले. विधानपरिषदेत विधानपरिषदेत उत्तर देताना म्हणाले, "नाथाभाऊ यांनी नवा शोध लावला आहे, मी अशी घोषणा कधी केली नव्हती. माझ्या लग्नात तुम्हीही उपस्थित होतात नाथाभाऊ, आमचे नेते होतात तेव्हाच तेव्हा, मी जर असं काही म्हणलो असतो तर तु्म्ही थांबवले असते ना माझे लग्न", असं फडणवीस म्हणाले, अन् सभागृहात एकच हशा पिकला.
आपण फडणवीसांची ही घोषणा वर्तमानपत्रात वाचल्याचे खडसेंनी सांगितले, यावर 'वर्तमानपत्रावर नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा,' असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले आहे.
फडणवीसांच्या भीष्मप्रतिज्ञेचे पुढे काय झाले? खडसेंनी विचारला होता प्रश्न!
विदर्भ प्रादेशिक विभागावर नेहमीच अन्याय होत असतो, यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यापूर्वीच वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात सहभागी झाले होते. विदर्भ वेगळा होत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही, या फडणवीसांच्या भीष्मप्रतिज्ञेचे पुढे काय झाले? सत्तेत आले म्हणून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा विसरलात का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी विचारला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.