Nagpur Winter Session : उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच 'नॉन सीरियस'! परिणय फुकेंची टोलेबाजी

Parinay Fuke : महाविकास आघाडीचे सरकार हे जोकर भरती असलेले सरकार होते, अशी फुके यांची टीका
Dr. Parinay Fuke, Uddhav Thackeray
Dr. Parinay Fuke, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच 'नॉन सीरियस' राजकारणी आहेत. त्यांना राजकीय पद मिळवण्यासाठी कधीही कोणतेही परिश्रम करावे लागले नाही. मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही त्यांना आयती मिळाली आहे, त्यामुळे त्यांनी या जबाबदार पदावरील काम करताना कधीच गांभीर्य दाखवले नाही, अशी टीका माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केली.

अधिवेशन सुरू झाले तरी उद्धव ठाकरे नागपुरात आलेले नाहीत. केवळ दोन दिवस ठाकरे हे अधिवेशनात सहभागी होणार आहेत. त्यातही हे दोन्ही दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे मोर्चे निघणार आहेत. त्यामुळे ठाकरे हे किती तास विधान परिषदेत देणार याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे भाजपने ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. (Maharashtra Assembly Winter Session 2023)

Dr. Parinay Fuke, Uddhav Thackeray
Rohit Pawar : कॅसिनो विधेयकासाठी रोहित पवारांकडून ‘अनुभवी’ बावनकुळेंची ‘शिफारस’

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानासुद्धा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सरकार चालवायचे, ही बाब जगजाहीर आहे. मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे हे कधीच गंभीर नव्हते. मंत्रिमंडळातील कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नव्हता. कोणतेही मंत्री कोणतीही घोषणा करायचे आणि तोंडघशी पडायचे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार हे जोकर भरती असलेले सरकार होते, अशी टीकाही परिणय फुके यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या जनतेची चिंता असती तर ते विधिमंडळाच्या कोणत्याही अधिवेशनात पहिल्या दिवसापासून कामकाजात सहभागी झाले असते. राज्य विधिमंडळातील रेकॉर्डची तपासणी केली, तर ठाकरे पिता-पुत्रांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या विषयांसाठी किती तास दिले, ही बाब जगजाहीर होईल, असा दावाही फुके यांनी केला. कोविडच्या महासाथीने महाराष्ट्रात थैमान घातले असताना ठाकरेंचे राजपुत्र विदेशात मौजमजा करीत होते. त्यामुळे या दोघांनाही लोकनेता वगैरे बिरुद आपल्या नावामागे लावण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

Dr. Parinay Fuke, Uddhav Thackeray
Nagar News : भाजपचे आमदार आणि शरद पवार गटाचे सरचिटणीस यांच्यात 'कलगीतुरा'...

कोणत्याही कामकाजात रस नसलेल्या ठाकरे पिता-पुत्रांनी विधिमंडळातील खुर्च्या अडवण्यापेक्षा सरळ राजीनामा देऊन मोकळे व्हावे. शिवसेनेतील 40 आमदार बाहेर पडेपर्यंत ज्या पक्षप्रमुखाला साधी कल्पनाही येत नाही, अशा नेत्याने उगाच महत्त्वाच्या पदांवर जागा अडवू नये. उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरुद्ध होत असलेला उद्रेक ओळखत ज्याप्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत थोडी समजदारी व हुशारी दाखवली, अगदी त्याच पद्धतीने त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा. आपल्या राजपुत्रालाही विधानसभेचा राजीनामा द्यायला लावावा, अशी मागणीही फुके यांनी केली.

Dr. Parinay Fuke, Uddhav Thackeray
Vijaykumar Gavit News : विजयकुमार गावित यांच्यावर कारवाईऐवजी मंत्रिपदाचे बक्षीस?

दोन दिवसांसाठी हिवाळी अधिवेशनाला आल्याचे नाटक करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी नागपुरात न येण्याची व आपल्या पक्षातील उरल्यासुरल्या नेत्यांना खर्चात न टाकण्याची समयसूचकता दाखवावी. ठाकरे पिता-पुत्र हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्याने खूप काही क्रांतिकारी फरक पडेल, असे वाटत नाही, असा टोला फुके यांनी लगावला.

(Edited By - Rajanand More)

Dr. Parinay Fuke, Uddhav Thackeray
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा समन्वयावर भर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com