Akola News: धक्कादायक! रुग्णांना दिलेल्या जेवणात जिवंत अळ्या!

MNS Saropchar Hospital : मनसे आक्रमक, डीनच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन
Akola Medical College
Akola Medical CollegeSarkarnama
Published on
Updated on

Akola : जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालय नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. येथील असुविधांविषयी कायम तक्रारी येत असतात. आता तर या रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नात चक्क जिवंत अळ्या सापडल्या आहेत. शिजवलेल्या गरम अन्नात जिवंत अळ्या कशा आल्या? असा प्रश्न रुग्णांकडून उपस्थित केला जातो आहे. या प्रकरणानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या डीनच्या कक्षात ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

Akola Medical College
Amol Mitkari News :'...मग समजेल कोण सर्कशीतील वाघ'; अमोल कोल्हेंना डिवचले

मेहरे या रुग्णाला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 31 मध्ये दाखल करण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाला दिवसातून दोन वेळा जेवण दिले जाते. या रुग्णालाही जेवण देण्यात आले. रुग्णाचा मुलगा रामकृष्ण मेहरे यांनी अन्न घेतले असता त्यात एक जिवंत अळी त्याला फिरताना दिसून आली. रामकृष्ण यांनी प्रथम वॉर्ड बॉय आणि कर्मचाऱ्यांकडे जेवणाची तक्रार केली. तेव्हा त्यांनी ते अन्न घेऊन फेकून दिले.

रुग्णाच्या जेवणात अळी सापडली असतानाही रुग्णालयाच्या प्रशासनाकडून गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्याशी संपर्क साधला. राजेश काळे व महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे व प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकर हे तक्रार घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अध्यक्षा मीनाक्षी गजबिये यांना गाठले.

गरम जेवणात अळी आढळणे ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने समिती स्थापन करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन 'सरकारनामा'शी बोलताना शासकीय रुग्णालयाच्या डीन मीनाक्षी गजभिये यांना दिले.

(Edited By Roshan More)

Akola Medical College
Sanjay Gaikwad News : "तुम्हाला पदराखाली घेतलं..", शिवसेना आमदाराकडून संजय राऊत टार्गेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com