Yashomati Thakur On SIR Campaign : SIR अभियानात मतदार यादीतील नावं परस्पर वगळली; यशोमती ठाकूरांच्या आरोपांनी खळबळ, फौजदारी कारवाईचा इशारा

Yashomati Thakur alleges illegal voter deletions during SIR campaign, seeks criminal action after inquiry : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानादरम्यान अमरावतीत मतदार यादीतून नावे वगळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
Yashomati Thakur On SIR Campaign
Yashomati Thakur On SIR CampaignSarkarnama
Published on
Updated on

summary

  • यशोमती ठाकूर यांनी मतदार यादीबाबत गंभीर आरोप

  • SIR अभियानात मतदारांची नावे वगळल्याचा आरोप

  • मतदार यादीतून नाव गायब झाल्यास काय करावे

Amravati News : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभर सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) अभियानादरम्यान मतदार यादीतील नावांबाबत वाद निर्माण झाला आहे. मतदार यादीतून नागरिकांची नावे परस्पर वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला असून, यामागील जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यापूर्वी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ऑनलाइन मॅपिंग प्रक्रियेदरम्यान कथित अनियमिततेचे आरोप समोर आले होते. त्यानंतर आता मतदार यादीतील (Voter List) नावे वगळली जात असल्याच्या तक्रारींमुळे SIR अभियानाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या आरोपांबाबत निवडणूक प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

अमरावती (Amaravati) येथे बूथ प्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी मतदार यादीतील नावांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, मतदार यादीतून अनेकांची नावे वगळली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काँग्रेसच्या एका युवक पदाधिकाऱ्याचेही नाव यादीतून वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. नियमानुसार नाव वगळण्यासाठी अर्ज (फॉर्म) भरल्यानंतरच प्रक्रिया होते. मात्र, संबंधित मतदारांच्या माहितीशिवाय फॉर्म भरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Yashomati Thakur On SIR Campaign
SIR voter verification controversy : मतदार पुनरीक्षण प्रक्रियेत घोटाळा? ‘SIR’ योजनेत डेटामध्ये फेरफार, ऑनलाइन मॅपिंग वाढवल्याचा आरोप

याप्रकरणी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक शाखेकडे माहिती मागवली असून, फॉर्म कोणी भरला आणि त्यावर कार्यवाही कोणी केली याची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Yashomati Thakur On SIR Campaign
Sarpanch Firing Incident : संगमनेर हादरलं! भाजपच्या माजी सरपंचावर पिस्तुलातून गोळीबार; घरावर तलवारीने हल्ला, मुरूम वादातून थरार

SIR प्रक्रिया लवकर उरकण्यामागे षडयंत्र

यशोमती ठाकूर यांनी SIR प्रक्रियेच्या कालावधीवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अशा पुनरीक्षण प्रक्रियेला दीर्घ कालावधी लागत असे. मात्र, यावेळी कमी कालावधीत मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असल्याने शंका निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर राजकीय हेतूने मतदार यादीत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. तथापि, या आरोपांवर संबंधित यंत्रणा किंवा सत्ताधारी पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

7000 मतदारांची नावे वगळली

मतदारांनी स्वतःचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही ठाकूर यांनी केले. तिवसा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे 7000 मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत, त्या नावांबाबत चौकशीची मागणी त्यांनी केली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका मांडली.

FAQs

1. SIR अभियान म्हणजे काय?

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision) ही मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आहे.

2. मतदार यादीतून नाव वगळल्यास काय करावे?

संबंधित निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) किंवा BLO यांच्याशी संपर्क साधून आवश्यक अर्ज भरावा.

3. यशोमती ठाकूर यांनी कोणता आरोप केला?

मतदारांच्या माहितीशिवाय नावे वगळली जात असल्याचा आरोप करून फौजदारी कारवाईचा इशारा दिला.

4. निवडणूक आयोगाने यावर प्रतिक्रिया दिली आहे का?

या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

5. मतदार यादी ऑनलाइन कशी तपासावी?

भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतदार सेवा पोर्टलवर किंवा Voter Helpline App वर नाव तपासता येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com