Sarpanch Firing Incident : संगमनेर हादरलं! भाजपच्या माजी सरपंचावर पिस्तुलातून गोळीबार; घरावर तलवारीने हल्ला, मुरूम वादातून थरार

Former Sarpanch and BJP leader Sandeep Ghuge narrowly escapes after armed attackers open fire and vandalize his house Sangamner over murum transport dispute : संगमनेरच्या मालुंजे इथं भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Sarpanch Firing Incident
Sarpanch Firing IncidentSarkarnama
Published on
Updated on

Sangamner BJP Leader Attack : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे मुरूम वाहतुकीच्या वादातून भाजप पदाधिकारी आणि माजी सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे यांच्यावर थेट पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.

एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर तलवारीने हल्ला करत मोठी तोडफोड केली. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, संगमनेरमधील (Sangamner) मालुंजे येथील गोसावी फाटा परिसरात संदीप घुगे यांचे निवासस्थान आहे. मुरूम वाहतुकीच्या वादातून दोन दुचाकींवर आलेल्या आरोपींनी थेट घुगे यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे) आणि प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डिग्रस) या दोघांनी संदीप घुगे यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले.

याचवेळी सुदर्शन श्रीराम आणि इतर तिघांनी घुगे यांच्या घरावर धाड टाकत तलवारीने दरवाजा आणि खिडक्यांवर वार करून मोठी तोडफोड केली. हल्लेखोरांच्या (Crime) भीतीने संदीप घुगे यांचे कुटुंबीय घरातच लपून बसले होते. पसार होण्यापूर्वी आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची माहिती समोर आली आहे.

Sarpanch Firing Incident
Shrirampur firing : श्रीरामपूर हादरले! भरदिवसा युवकावर गोळीबार अन् चाकू हल्ला; गँगवॉरमुळे शहर ‘क्राईम कॅपिटल’ बनल्याची चर्चा

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच स्थानिक गन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनीही तपास सुरू केला आहे.

Sarpanch Firing Incident
Shiv Sena Leader Attack : रॉड, दांडके, पिस्तुल अन् गँगवॉरचा अँगल? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या युवा नेत्यावर गोळीबारात नगरसेवकासह नऊ जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणी संदीप घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल खेमनर, प्रवीण पुणेकर, सुदर्शन श्रीराम आणि अन्य तिघा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी संगमनेर तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त पथके काम करत असून, सर्व आरोपींना लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल.

संगमनेरमध्ये कायदा-सुव्यवस्था पुन्हा चर्चेत

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला अनेक महिने उलटून गेले तरी आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातच आता मालुंजे येथे माजी सरपंचावर थेट गोळीबार आणि घरावर तलवारीने हल्ला झाल्याने संगमनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सलग घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आह

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com