Amravati : "...तर बच्चू कडूंचं महाविकास आघाडीत स्वागत!"; काँग्रेसच्या महिला नेत्याचं मोठं विधान

Yashomati Thakur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस अमरावती येथे मुक्कामी आहेत.
Yashomati Thakur, Sharad Pawar & Bachchu Kadu
Yashomati Thakur, Sharad Pawar & Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi : महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील मंत्रिपदाचा दर्जा असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अमरावती जिल्ह्यात भेट होणार आहे. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेल्या या दोन पक्षातील नेत्यांची यावेळी कोणती चर्चा होते, शरद पवार-बच्चू कडू यांच्या भेटीतून कोणता राजकीय गोडवा निर्माण होतो, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

पवार-कडू भेटीच्या पार्श्वभूमिवर अनेक राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अशातच कॉंग्रेसच्या माजी मंत्री तथा तिवसा विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी मोठे विधान केले आहे. आमदार अॅड. ठाकूर यांनी बच्चू कडू यांचे महाविकास आघाडीत स्वागत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींबाबत त्या अमरावती येथे बुधवारी (ता. 27) बोलत होत्या.

Yashomati Thakur, Sharad Pawar & Bachchu Kadu
Amravati : बच्चू कडू-शरद पवारांच्या भेटीनंतर राजकीय संबंधात 'गोडवा'?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस अमरावती येथे मुक्कामी आहेत. आपल्या दौऱ्यात ते अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. बच्चू कडू यांचे कुरळपूर्णा येथे निवासस्थान आहे. शरद पवार हे कुरळपूर्णा येथे जात बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातून अनेक चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सत्तेत सहभागी असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मराठा आरक्षण आदी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला होता. त्यामुळे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

अधिवेशानातील भूमिका पाहता आमदार कडू यांची महायुतीत घुसमट तर होत नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. बच्चू कडू लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तेतून बाहेर पडतील, असेही त्यानंतर बोलले जात होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे अमरावती जिल्ह्यात आमदार कडू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतून फारकत घेत बच्चू कडू हे महाविकास आघाडीशी घरोबा करतील, असे सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या संदर्भात अमरावती येथे काँग्रेसच्या माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना माध्यमांनी विचारल्यावर बच्चू कडू हे स्वयंभू नेते आहेत, असे त्या म्हणाल्या. आमदार कडू यांची संघटनात्मक बांधणी वाखाणण्याजोगी आहे. कडू महाविकास आघाडीत आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे सूचक आणि मोठे वक्तव्य ठाकूर यांनी केले. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सोडून जायला नको होते, असेही ठाकूर यावेळी म्हणाल्या. ठाकूर यांच्या या वक्तव्याने ऐन गारठ्यात राजकीय वातावरण तापणार आहे. अशात पवार-कडू भेटीनंतर काय घडामोडी घडतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Yashomati Thakur, Sharad Pawar & Bachchu Kadu
#shorts : शरद पवारांची एन्ट्री होताच कार्यकर्त्यांनी बघा काय केलं ? | Sharad Pawar At Amravati

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com