यशोमती ठाकूर म्हणतात, पंकजा मुंडे ओबीसी असल्याने...

OBC| BJP|Pankaja munde| भाजपकडून मोठ्या प्रमाणात ओबीसींना डावलण्याचे प्रयत्न सुरू
Yashomati Thakur
Yashomati Thakur Twitter/@Yashomati Thakur

शेगाव: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ओबीसी असल्यामुळे भाजपने (BJP) त्यांचा पराभव केला, प्रितम मुंडेंना मंत्रीपद दिले नाही. दोघीही बहिणी चुकीच्या पक्षात आहेत, आज भाजपकडून मोठ्या प्रमाणात ओबीसींना (OBC ) डावलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी घणाघाती टीका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली आहे. (

ओबीसी महासंघाच्यावतीने शेगांवमध्ये आयोजित ओबीसी समाज अधिकार संमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड सहभागी झाले.

Yashomati Thakur
उद्धव ठाकरेंविरोधात कॉंंग्रेसचा माजी मंत्री आक्रमक; थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकार ओबीसींचा केवळ मतं देणारी मशीन म्हणून वापर करत आहे. देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. माेदी सरकार केवळ राम नाम जपना, पराया माल, या नीतीने वागत असल्याचेही मुख्यमंत्री बघेल यावेळी म्हणाले.

देशात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने होत असताना ज्या संस्थांमध्ये आरक्षणातून नोकरी देता येते, त्या संस्थांच केंद्र सरकार विकत आहे. असे केल्याने शासकीय संस्थाच शिल्लक राहणार नाहीत, मग आरक्षण तरी कुठून मिळणार? असा सवाल भूपेश बघेल यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता मोदी सरकारने विक्रीस काढलेले सर्व सार्वजनिक संस्था वाचवाव्या लागतील, त्यासाठी ओबीसींचा लढा उभारावा लागेल,’ असे आवाहन भूपेश बघेल यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com