उद्धव ठाकरेंविरोधात कॉंंग्रेसचे माजी मंत्री आक्रमक; थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Shivsena| Congress| Mahavikas Aghadi| कॉंग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर शिवसेनेला पाठिंबा
Uddhaa Thackeray- nasin khan
Uddhaa Thackeray- nasin khan sarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री नसीन खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , अनिल परब (Anil Parab) आणि त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) याचिका दाखल केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची वेळ संपलेली असतानाही त्यांनी सभा घेतली. आदर्श आचार संहितेचं उल्लंघन केलं, असा आरोप नसीन खान यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

याबाबत विचारले असता ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुका सुरू होत्या. १९ ऑक्टोबरला प्रचार संपून आचारसहिंता लागू झाली, २१ ऑक्टोबरला मतदान असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सेनेच्या काही उमेदवारांनी २० ऑक्टोबरला रात्री ९ वाजता सभा घेत पदयात्रा काढली.उद्धव ठाकरे, अनिल परब आदर्श आचारसंहितेचा भंग झाला. त्यावेळी आम्ही याबाबत तक्रारही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Uddhaa Thackeray- nasin khan
Price Hike : सात दिवसात सहाव्यांदा इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेल चार रुपयांनी वाढले

पण यावेळी महाविकासआघाडी सरकारला काँग्रेसचा पाठिंबा देण्याचा भाग वेगळा आणि हा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणं वेगळा भाग वेगळा आहे. यात दुटप्पी भूमिकेचा कोणता प्रश्नच नाही. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊन माझ्यासोबत जो अन्याय झाला आहे त्याबद्दल मी ही तक्रार केली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या आधी, महाविकास आघाडी सरकारची स्थापना होण्याआधीची ही याचिका दाखल झाली आहे.

“हा न्यायालयीन विषय आहे. आमचा व्यक्तिगत विषय आहे. माझ्या याचिकेने भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं असंही म्हणता येणार नाही. याचा पक्षाशी किंवा कॉंग्रेसचा पाठिंब्याशी काहीही संबंध नाही. कॉंग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वात हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालेल तोपर्यंत या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका काँग्रेसकडून होणार नाही.” असंही नसीन खान यांनी म्हटलं आहे.

यासोबतच केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करुन विरोधी पक्ष राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार काँग्रेस, राष्ट्रवादीचा २०१९ चा जाहीरनामा लागू करेल अशीही आशा आहे,” असंही नसीन खान यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com