Nagpur Winter Session : सरकारचं चाललंय तरी काय? विधानसभेत यशोमती ठाकूर कडाडल्या

Yashomati Thakur : विधानसभेत सरकारवर हल्लाबोल; रत्नागिरीतील साकवांच्या मुद्द्यावर आक्रमक
Yashomati Thakur in Vidhan Sabha Nagpur.
Yashomati Thakur in Vidhan Sabha Nagpur.Google
Published on
Updated on

Vidhan Sabha : राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नदीवर साकव नसल्याने स्थानिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आवश्यक असताना निवडणूकही घेण्यात येत नाहीे. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारकडे कुठलेच धोरण नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत सरकारवर हल्ला चढवला. प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सावडाव-नेरले आणि मिळदे-हातगे या गावांदरम्यान आवश्यक असतानाही जिल्हा नियोजन समितीमधून साकव पूर्ण करण्यात येत नसल्याकडे लक्ष वेधले. आमदार राजन साळवी यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात या विषयावर चर्चा उपस्थित केली. यावर उत्तर देताना रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एका साकवासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च येतो असे सांगितले.

Yashomati Thakur in Vidhan Sabha Nagpur.
Nagpur Winter Session : अब्दुल सत्तार यांनी विधानसभेतच विरोधकांपुढे हात जोडले....

जिल्हा नियोजन समितीमधून एका साकवासाठी एवढी रक्कम खर्च करता येत नाही. जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचा निधी एका साकवासाठी दिला जातो. त्यामुळे हे साकव बांधण्यासाठी वेगळ्या शिर्षाखाली तरतूद करावी लागणार असल्याचे ते म्हणाले. एकूणच राज्यातील साकवांसाठी 1 हजार 300 कोटी रुपये लागणार आहेत त्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे ते म्हणाले. मंत्री चव्हाण यांच्या या उत्तराने समाधान न झालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार ॲड. ठाकूर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

सरकारला जनतेच्या प्रश्नांमध्ये कुठलेही स्वारस्य दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील या दोन साकवांच्याअभावी स्थानिकांचा जीव धोक्यात आला आहे. लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. साकव नसल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. लोकांना अतिशय दूरवरून प्रवास करावा लागतो. यावरून सरकार निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने राज्यातील साकवांबाबत निश्चित धोरण ठरवले पाहिजे. सरकारला जिल्हा परिषदांची निवडणूक घ्यायची नाही. लोकप्रतिनिधींनी कारभार करावा, असे सरकारला वाटत नाही. दुसरीकडे सरकार स्वतःही निष्क्रिय आहे. कुठलेही धोरण सरकार ठरवत नाही, ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपासून यशोमती ठाकूर सातत्याने सरकारवर प्रहार करीत आहेत. अमरावतीचे नाव अवकाळी पाऊस आणि गारपिटग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून वगळल्याबद्दल काही दिवसांपूर्वी त्यांनी संताप व्यक्त केला होता. पालकमंत्र्यांवरही त्यांनी टीका केली होती. सरकार अफूची गोळी घेऊन काम करतेय का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

Edited by : Prasannaa Jakate

Yashomati Thakur in Vidhan Sabha Nagpur.
Nagpur Winter Session : 'जस्ट वाव... लुक’मध्ये अजितदादांची 'मेट्रो राइड'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com