Amravati District APMC Election Results News : अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्वस्व कायम असून विरोधकांचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाला आहे. काँग्रेस आघाडीच्या सर्वच १८ जागा निवडून आल्या आहेत. (All 18 seats of the Congress alliance were elected)
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, युवा स्वाभिमान पॅनलचा दारुण पराभव झाला. तिवसा बाजार समितीवर काँग्रेसला भरभरून यश मिळाले आहे. १८ पैकी १८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्यांदा माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील बाजार समितीत ठाकरे गटासोबत उमेदवार दिले. यात यशोमती ठाकूर यांना मोठं यश मिळाले आहे.
काँग्रेस आणि ठाकरे गट यात विजयी झाले आहे. उमेदवार विजयी होताच आमदार यशोमती ठाकूर यांनी या जल्लोषात सहभागी होत कार्यकर्त्यांसह गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवारात राजेश वेरुळकर, विवेक देशमुख, विनायक तसरे, गजानन वानखडे, मनोज साबळे, स्वप्निल केने, जयकांत माहुरे, मेघा गोहत्रे, वंदना पारेकर, रवींद्र राऊत, मंगेश राठोड, राजेंद्र मढावे, विशाल सावरकर, अशोक मनोहर, जितेंद्र बायस्कर, कैलासकुमार पनपालिया, तुळशीराम भोयर, मोहन चर्जन यांचा समावेश आहे.
यावेळी (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर, ठाकरे गटाचे विलास माहुरे, युवती सेनेच्या तेजस्विनी वानखडे, दिलीप काळबांडे, मुकुंद देशमुख काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश पारधी, शहराध्यक्ष शेतू देशमुख, नगराध्यक्ष योगेश वानखडे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने, पंकज देशमुख, मुकुंद पुनसे, हरिदास भगत यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते उपस्थिती होते.
मतदानासह मतमोजणी प्रक्रिया निवडणूक (APMc Election) निर्णय अधिकारी गजानन डावरे यांच्या मार्गदर्शनात पार पडण्यात आली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.