Yavatmal Bank Election : आमदार धानोरकरांनी भरून काढली दिवंगत खासदारांची उणीव, पाटलांना दिले पाठबळ !

Balu Dhanorkar : खासदार बाळू धानोरकर यांचा सिंहाचा वाटा होता.
Balu and Pratibha Dhanorkar
Balu and Pratibha DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Political News : गतवेळी झालेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचे अकाली निधन झाले. मात्र, त्यांची उणीव पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भरून काढली. (MP Balu Dhanorkar had the lion's share)

मतदार संचालकांच्या संपर्कात राहून उपस्थिती दर्शवित त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील यांना पाठबळ दिले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रा. टिकाराम कोंगरे यापूर्वी अध्यक्ष होते. त्यांना बँकेच्या अध्यक्षपदी आरूढ करण्यात राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा सिंहाचा वाटा होता. चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांत विस्तार असलेल्या लोकसभा मतदारसंघाचे बाळू धानोरकर नेतृत्व करायचे.

काही महिन्यांपूर्वी बाळू धानोरकर यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एवढेच नव्हेतर चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघासोबतच चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतही पोकळी निर्माण झाली होती. आज (ता. २५) झालेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही ती पोकळी जाणवणार, असा अनेकांचा समज होता. मात्र, त्यांचा हा समज साफ खोटा ठरला.

बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच आमदार प्रतिभा धानोरकर या येथील काँग्रेस नेते आणि उमेदवार मनीष पाटील, मतदार संचालक आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात होत्या. नव्हेतर आज सकाळी त्यांनी यवतमाळात दाखल होत जिल्हा काँग्रेस कार्यालय गाठले. शिवाय मनीष पाटील यांना पाठबळ देत निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. हे चित्र पाहून आमदार धानोरकर यांनी दिवंगत पती बाळासाहेबांची उणीव भरून काढल्याची चर्चा होती.

संपर्क वाढविण्यावर भर...

बाळू धानोरकरांच्या एक्झिटनंतर चंद्रपूर-आर्णी हा लोकसभा मतदारसंघ पोरका झाला होता. मात्र, स्वतःला दुःखातून सावरत प्रतिभा धानोरकर यांनी आता या मतदारसंघात संपर्क वाढवायला सुरुवात केली. त्यातूनच त्यांनी बाळू धानोरकरांच्या निधनाने हा मतदारसंघ पोरका झाला नसून त्यांचे कर्तव्य आता आपण पार पाडणार, असा संदेशच त्यांनी दिल्याचे आता बोलले जात आहे.

नेत्यांच्या समजूतदारपणे विजय...

महाविकास आघाडी कॉंग्रेसचा एकही आमदार नाही, एकमेव खासदार बाळू धानोरकरच होते. आता या निवडणुकीसाठी आघाडीच्या विरोधात भाजपचे पाच आमदार, पालकमंत्री संजय राठोडही त्यांच्याचकडून आमदार मदन येरावार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारही होते. त्यातही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली. तरीही १५ विरुद्ध सहा असा निकाल आला.

अशाही परिस्थितीत महाविकासच्या नेत्यांनी अतिशय समजदारीने कुठेही फूट न पडू देता ही निवडणूक हाताळली आणि जोरदार विजय मिळवला. अशीच एकजूट आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये दाखवल्यास महाविकास आघाडीपासून विजय फार लांब आहे, असे वाटत नाही.

Edited By : Atul Mehere

Balu and Pratibha Dhanorkar
Balu Dhanorkar News : ढाण्या वाघाची राहिलेली कामं आपण पूर्ण करू, प्रतिभा धानोरकरांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com