Yavatmal District Congress Rally News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (ता. ५) यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतावर जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून जनसंवाद पदयात्रेला यवतमाळ येथे सुरुवात झाली. यात्रेदरम्यान ग्रामीण भागातून जात असताना वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Vadettiwar interacted with the farmers)
पदयात्रा शहरातील अनेक भागांतून तसेच ग्रामीण भागात पुढे जाणार आहे. ही यात्रा यवतमाळ विधानसभेत प्रवेश करताच बाईक रॅली काढण्यात आली होती. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जनसंवाद पदयात्रा काढण्यात आल्याचे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या दिवशी हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत शहरातील अनेक भागांतून ही यात्रा ग्रामीण भागात जाणार आहे
यवतमाळ विधानसभा क्षेत्रात यात्रेचा प्रवेश होताच बाईक रॅली काढण्यात आली. जनसंवाद यात्रेचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे (ZP) माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी केले. यावेळी डॉ. वजाहत मिर्झा, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, संजय राठोड, संजय ठाकरे, यवतमाळ (Yavatmal) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष वंदना आवारी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, युवक काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष उन्मेष पुरके व पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.
लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत लोकांशी संवाद काँग्रेस कार्यकर्ते या पदयात्रेदरम्यान साधत आहेत.
शहरातील कळंब चौकात यात्रेचे स्वागत झाले. तसेच ही रॅली शहरातून संवाद साधत पुढे ग्रामीण भागात निघून गेली.. या जनसंवाद यात्रेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, बबलू देशमुख, छोटू सवई, विकी राऊत, कुणाल जतकर, शुभम शेंडे आदी सहभागी झाले.
वडेट्टीवार पोचले शेतीच्या बांधावर..
यवतमाळमधील कार्यक्रम झाल्यावर आर्णीकडे जाताना माळम्हसोला या गावात शेतीच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत शेतकरी दांपत्य परशराम तडसे यांचा सपत्नीक सत्कार केला व शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी जावेद अन्सारी, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, प्रदीप साळवे, संजय भोयर, नारायण राठोड, सरपंच उमेश चव्हाण आदी होते.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.