NCP vs BJP News : अजितदादांच्या मंत्र्यांचं घर फुटलं : सख्खा भाऊ भाजपमध्ये, 8 महिन्यांचे प्रयत्न यशस्वी

NCP vs BJP News : महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या नाईक घराण्यात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री इंद्रनील नाईक यांचे सख्खे भाऊ ययाती नाईक यांनी भाजपात प्रवेश केला.
Yayati Naik's BJP entry sparks political storm, marking a major rift in Maharashtra’s influential Naik family from Yavatmal.
Yayati Naik's BJP entry sparks political storm, marking a major rift in Maharashtra’s influential Naik family from Yavatmal.Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या नाईक घराण्यात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री इंद्रनील नाईक यांचे सख्खे भाऊ ययाती नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात एकेकाळी नाईक घराण्याचा दबदबा होता. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे काका-पुतणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सुधाकर नाईक यांचे बंधू मनोहर नाईक हेही अनेक वर्षे मंत्रिमंडळात होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

त्यावेळी सुधाकरराव नाईक विजयी झाले. त्यांच्या निधानानंतर मनोहरराव नाईक आमदार आणि मंत्री झाले. आता नवी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. सुधाकरराव नाई यांचे बंधू मधुकरराव नाईक यांचे चिरंजीव ॲड. नीलय नाईक हे यापूर्वीच भाजपात गेले आहेत. ते विधान परिषद सदस्य होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इंद्रनील आणि ययाती यांच्यातउमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाली होती. अजित पवार यांनी इंद्रनील नाईक यांना पसंती दिली. कुटुंबीयांनीही इंद्रनील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ययाती नाराज झाले होते. त्यांनी बंडखोरीची तयारी केली होती. मात्र सर्वांनी त्यांची समजूत काढली.

Yayati Naik's BJP entry sparks political storm, marking a major rift in Maharashtra’s influential Naik family from Yavatmal.
BJP Jaykumar Gore action : रोहित पवारांच्या मतदार संघातील ग्रामपंचायतीवर मंत्री गोरेंची मोठी कारवाई

शेवटी ययाती यांनी पुसद सोडून कारंजा येथून अपक्ष निवडणूक लढली होती. यात ते अपयशी ठरले. महायुतीची सत्ता आल्यानंतर इंद्रनील नाईक मंत्री झाले. तेव्हापासूनच भाजप ययाती यांच्या संपर्कात होती. पुसद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ययाती यांचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

ययाती यांना घेऊन भाजपने जातीय समीकरण साधल्याचे दिसून येते. या भागात बंजारा आणि आंद या आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. नाईक हे बंजारा समाजाच्या आहेत तर भाजपच्या जिल्हाध्यक्ष आरती फुकाटे या आंद समाजाच्या आहेत. ययाती आणि फुकाटे यांच्या रूपाने दोन्ही समाज एकत्र आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा फायदा भाजपला होईल असे गणित मांडले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com