YDCC Bank News: अध्यक्षांच्या विरोधात कॉंग्रेसच्या संचालकांनी उघडली मोहीम, खासदार धानोरकर काय निर्णय घेणार?

Yavatmal News: त्यावेळी कुणीही पुढे येऊन विरोध केला नसल्याने प्रकरण शांत झाले.
Balu Dhanorkar, Shivajirao Moghe, Manikrao Thakre and Tikaram kongare.
Balu Dhanorkar, Shivajirao Moghe, Manikrao Thakre and Tikaram kongare.Sarkarnama

Yavatmal District Central Co-Operative Bank News: वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावेळी कुणीही पुढे येऊन विरोध केला नसल्याने प्रकरण शांत झाले. स्वीकृत सदस्यांची निवड होताच संचालकांच्या मनातील खदखद दिसून येत आहे. (The formula for the post of President was fixed in the Congress)

बँकेतील काँग्रेसच्या नऊ पैकी सात संचालकांनी खासदार बाळू धानोरकर यांना दिलेल्या पत्रात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांना बदल्याची मागणी केली आहे. तसे पत्र जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी मंगळवारी (ता. 9) चंद्रपूर येथे धानोरकर यांच्या निवासस्थानी दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तास्थापनेच्या वेळी काँग्रेस अंतर्गत अध्यक्ष पदाचा फॉर्म्यूला ठरला होता. त्यावेळी विद्यमान अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांना दोन वर्षे देण्यात आल्याची चर्चा त्यावेळी होती.

जानेवारी महिन्यात विद्यमान अध्यक्षांना दोन वर्षे पूर्ण झाले होते. त्यामुळे अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेसची अंतर्गत मोहीम सुरू झाली होती. काहींनी मोहीम जरी सुरू केली, तरी पुढाकार घेऊन खासदार बाळासाहेब धानोरकर यांच्याशी बोलणार कोण? यातच बराच कालावधी निघून गेला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळी खासदारांना अध्यक्ष बदलाची आठवण करून दिली होती. मात्र, विद्यमान काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचाच अध्यक्ष होईल, याची शाश्वती नव्हती. त्यामुळे अध्यक्ष बदलाची हालचाल मंदावली.

गेल्या महिन्यात दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. तेव्हापासून पुन्हा अंतर्गत विसंवाद वाढल्याची चर्चा आहे. काही संचालक नाराज असून त्यांनी अध्यक्ष बदलण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी मंगळवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निवासस्थानी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली.

Balu Dhanorkar, Shivajirao Moghe, Manikrao Thakre and Tikaram kongare.
Yavatmal District APMC Analysis : बाजार समितीच्या निकालाने महाविकास आघाडी चार्ज !

तेथेच जिल्हा बँकेतील संचालकांच्या स्वाक्षरीचे पत्र खासदारांना देण्यात आले. बँकेतील नऊ पैकी सात संचालकांच्या स्वाक्षरी या पत्रावर असल्याची खात्रीलायक माहिती आहे. काँग्रेस संचालकांचेच पत्र असल्याने आता खासदार धानोरकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसचे नऊ संचालक जिल्हा बॅंकेत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) चार, शिंदे गट तीन, ठाकरे गट दोन, भाजप एक आणि दोन संचालक अपक्ष, असे पक्षीय बलाबल आहे.

खासदार धानोरकरांना देण्यात आलेल्या पत्रातील मजकूर..

यवतमाळ (Yavatmal) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank) अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी नेत्यांनी फॉर्म्यूला ठरविला होता. त्यानुसार दोन व तीन वर्षे ठरविले होते. यासंदर्भात विश्राम भवन येथे खासदार (Balu Dhanorkar) बाळू धानोरकर, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे (Manikrao Thakre) यांची चर्चा झाली होती. बँकेच्या अध्यक्षपदाबाबत काँग्रेस संचालकांची मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com