Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीत 'मनसे' प्रवेशाचा संभ्रम संपला? विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा, मुंबई मनपात काँग्रेस..!

MNS entry in Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे सांगण्यात येते. आघाडीचा याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नसताना नाशिकमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेने एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे सांगण्यात येते. आघाडीचा याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नसताना नाशिकमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेने एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अधिक संभ्रम वाढला असताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर केली.

ते म्हणाले, मुंबई महापालिका वगळता मनसेसोबत आघाडी करण्याचा अधिकार स्थानिक नेत्यांना दिला आहे. मुंबई महापालिका मात्र काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वडेट्टीवार यांनी जाहीर केले.

आघाडीबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. महायुतीमधील तीन पक्षांव्यतिरिक्त मनसे असो वा बसपा, वंचित आघाडी यांना आघाडीत घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. उद्या मनसे आणि काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये एकत्र लढणार असले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तसे अधिकार आम्ही सर्वांना दिले आहेत.

आमची अट फक्त एकच आहे. महायुतीमधील भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांच्या सेनेसोबत आघाडी करायची नाही. कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत असलेल्यां सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसचा त्यास विरोध राहील असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Vijay Wadettiwar
Sandip Kshirsagar : बीडमध्ये पंकजा मुंडेचा मोठा डाव; आमदार संदीप क्षीरसागर यांचा सख्खा भाऊच भाजपच्या वाटेवर!

उद्धव आणि राज ठाकरे यांची जवळीक चांगलीच वाढली आहे. भाजपच्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात दोघांनी एकत्रित आंदोलन केले होते. मतचोरी आणि मतदार यांच्या विरोधाताही मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने आयोजित केलेल्या सभेत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. त्यानंतर मनसेला आघाडीच्या घेण्याचा हालचाली सुरू होत्या. काँग्रेसच्या काही नेत्यांनी यास जाहीर विरोध केला होता.

Vijay Wadettiwar
Bacchu Kadu : बच्चू कडूंची विदर्भातून थेट कोकणाच्या राजकारणात एन्ट्री, प्रहारची स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर मोठी घोषणा

राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावरून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात होते. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास विरोध असल्याचा दावा केला जात होता. विजय वडेट्टीवार यांनी याविषयी भूमिका स्पष्ट करून सर्व प्रश्नांची उत्तरे दिली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com