Vinod Tawde on Rahul Gandhi : विनोद तावडेंकडून राहुल गांधींना आव्हान; म्हणाले, नालासोपाऱ्यात या...

Vinod Tawde challenges Rahul Gandhi to Nalasopara visit: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाल्याने आज दिवसभर विरारमध्ये झालेल्या राड्यानंतर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नालासोपाऱ्यात भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातील वादाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला आहे. आज दिवसभर विरारमध्ये झालेल्या राड्यानंतर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

विनोद तावडे प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारला आहे. 'हे पाच कोटी रुपये कोणाच्या SAFE मधून आले आणि जनतेचा पैसा कोणी लुटला,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जनतेचे पैसे लुटून कुणाला टेम्पो पाठवला होता, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

Vinod Tawde
Vinod Tawde Latest News : मोठी बातमी! विनोद तावडे अन् भाजप उमेदवार नाईकांना निवडणूक आयोगाचा दणका!

त्यावर राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून आव्हान दिले आहे. 'राहुल गांधीजी तुम्ही स्वतः नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बघा, तेथील निवडणूक आयोगाची संपूर्ण कार्यवाही बघा आणि पैसे कसे आले हे सिद्ध करा." कोणतीही माहिती नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे पोरकटपणाचं लक्षणं असंही विनोद तावडे म्हणाले.

मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असतांना विरारमधील एका हॉटेलमध्ये आज दिवसभर मोठा राडा सुरू झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांच्यावर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालतं तावडेंवर 15 कोटीं रुपये वाटपाचा आरोप केला. तसेच याची नोंद ठेवण्यात आलेली डायरी देखील तिथे सापडल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे.

Vinod Tawde
Top 10 News : भाजप अन् काँग्रेसचा ‘परफॉर्मन्स’ हे पाच मुद्देही ठरणार ‘किंगमेकर’; तावडे यांची टीप सागर बंगल्यावरून? - वाचा राजकीय घडामोडी

त्यातून भाजप (BJP) आणि बाविआ कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षीतिज ठाकूर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ उडाला होता. तर दुसरीकडे भाजप बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना बेदम मारहाण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com