Nala Sopara News: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस शिल्लक असताना विरारमध्ये तुफान राडा झाला. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप बहुजन आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आता आचारसंहिता सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्यानं विनोद तावडे आणि भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमधील तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असतांना विरारमधील एका हॉटेलमध्ये मागील चार तासांपासून मोठा राडा सुरू होता. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांच्यावर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला होता. बहुजन आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंवर 15 कोटीं रुपये वाटपाचा आरोप केला असून याची नोंद असल्याऱ्या डायरी सापडल्याचा दावाही यावेळी करण्यात आला आहे.
त्यातून भाजप (BJP) आणि बाविआ कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षीतिज ठाकूर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ उडाला होता.
ठाकूर यांच्याकडून डायरीतील नोंदींवरून तावडेंना जाब विचाराला जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विनोद तावडेंवर आरोप केल्या प्रकरणात बोलताना बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी बोलतांना विनोद तावडे पैसे वाटप करणार असल्याची टीप आपल्याला भाजपच्याच नेत्याकडून मिळाली असल्याचा मोठा गौप्यस्पोट यावेळी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.